एक-दुजे के लिए..?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

जळगाव - सावखेडा (ता. जळगाव) शिवारातील जळगाव-शिरसोली रेल्वे लाइनवर अनोळखी तरुण- तरुणीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या दोघांची ओळख पटली नसली तरी प्रेमप्रकरणातून तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह एकाच गाडीखाली व जवळ-जवळ आढळून आले आहेत. छिन्नविछिन्न मृतदेहांचा पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून ओळख पटविण्यासाठी तालुका पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. स्टेशन मास्तरांच्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. 

जळगाव तालुक्‍यातील सावखेडा शिवारातील लोखंडी रेल्वेपुलावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास जळगाव-शिरसोली रेल्वे लाइनवर तरुण-तरुणीने धावत्या रेल्वेखाली मृत्यू झाल्याची घटना घडली. लोकमान्य टिळक- हटिया एक्‍स्प्रेसच्या रेल्वेमोटारमनने याबाबत स्टेशन अधीक्षक के. के. सिन्हा यांना कळविल्यानंतर त्यांनी तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरुण-तरुणीच्या मृतदेहाची माहिती मिळताच तालुका पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी केली. 

छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह
खांब क्रमांक ४१३/२८ दरम्यान धावत्या रेल्वेखाली आल्याने दोघांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वेरूळावर विखुरलेले आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करत दोन्ही  मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले. दोघा मृतदेहांना जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान रेल्वेरुळावर दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर सावखेडा शिवारातील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अंगावरील कपड्यांच्याही चिंध्या या भीषण घटनेत दोघांच्या कपड्यांच्याही चिंध्या झाल्याचे आढळून आले.

तरुणाच्या अंगावरील पॅंटच्या चिंध्यांमध्ये पोलिसांनी खिसे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातही ओळख पटेल या सारखे काहीही मिळून आलेले नाही. तर तरुणीच्या चेहऱ्यासह दोन्ही हातपाय आणि अंगावरील कपडेही ओळख पटविण्यासारखे शिल्लक नाहीत. तरुणाचे वय अंदाजे पंचवीस ते अठ्ठावीस आणि तरुणीही बावीस ते पंचवीस वयाची असण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तविली आहे.

सोशल मीडियाद्वारे शोध 
तरुण-तरुणीचा मृतदेह रेल्वेलाईनवर आढळून आल्यानंतर सावखेडा, शिरसोली, धानोरा, दापोरा आदी रेल्वेरुळालगत असलेल्या गावांतील पोलिस पाटलांना संपर्क करून तालुका पोलिसांनी माहिती कळवली असून जिल्ह्यातील हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तालुका पोलिसांनी व्हॉट्‌सॲपद्वारे माहिती देत ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल? 
मृत तरुण- तरुणीची ओळख पटावी, असा कुठलाही पुरावा (पर्स, पाकीट, मोबाईल, चिठ्ठी) पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेला नसून मृत तरुणाच्या हातावर ‘रूपाली- इंद्रा’ असे गोंदलेले आढळून आले आहे. प्रेमप्रकरणास विरोधातून तरुण-तरुणीने टोकाचा निर्णय घेतला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून रेल्वेरुळालगतच्या गावांमध्ये चौकशी केली आहे. धावत्या रेल्वेतून पडल्याच्या शक्‍यतेचाही पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: jalgaon news girl and boy death by railway dash