चाळीसगाव: गिरणा धरणाचा वीजपुरवठा खंडित

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सुरक्षा रक्षकांचे पगारही रखडले...
धरणाची सुरक्षा ज्यांच्या भरवशावर आहे. अशा सुरक्षा रक्षकांचे पगारही गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ते सुरक्षा रक्षक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पगार नसल्याने त्यांना कौटुंबिक व आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : वीजबिल थकल्यामुळे गिरणा धरणावरील वीजपुरवठा वीज कंपनीतर्फे काल(ता.27) दुपारी खंडित करण्यात आला. यामुळे धरण परिसर सायंकाळपासून अंधारमय झाला आहे.

गिरणा धरणाचे बिल काही महिन्यांपासून थकल्यामुळे वीज कंपनीतर्फे काल(ता.27) दुपारी बाराच्या सुमारास वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सध्या धरण क्षेत्रात होत असलेल्या कमी जास्त पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. तसेच काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विजेअभावी त्यावर मार्ग काढता येणार नसल्यामुळे धरणावर वीज असणे महत्त्वाचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत तर धरणावर वीज असणे आवश्यकच आहे. कारण रात्री-अपरात्री धरणावरील कर्मचाऱ्यांना पाणीसाठा तपासावा लागतो. परंतु आज वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

वास्तविक, वीज कंपनी व पाटबंधारे हे दोन्ही विभाग शासनाचे आहेत. असे असताना या दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळेच वीजपुरवठा खंडीत झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.  

सुरक्षा रक्षकांचे पगारही रखडले...
धरणाची सुरक्षा ज्यांच्या भरवशावर आहे. अशा सुरक्षा रक्षकांचे पगारही गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ते सुरक्षा रक्षक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पगार नसल्याने त्यांना कौटुंबिक व आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Jalgaon news girna dam electricity supply