सोने खरेदीसाठी आज सुवर्णयोग!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

जळगाव - भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोने खरेदी ही प्रत्येक कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि या खरेदीसाठी खास मुहूर्तही आहेत. यातीलच एक खास मुहूर्त म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी लोक सर्व शुभकामे करत असतात. त्यातच या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यास जीवन सुखमय होते, असे मानले जाते. त्यामुळे या मुहूर्ताला ग्राहकांची सुवर्ण खरेदीसाठी मोठी गर्दी असते.

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरू पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वांत शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. असा हा शुभ योग यंदा उद्या (९ नोव्हेंबर) आला आहे. हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरवात म्हणजेच प्रारंभ करतो. यात गृहप्रवेश, सोने व चांदी खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसाय सुरू, विद्यारंभ म्हणजेच शिक्षण सुरू करण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. गुरुपुष्यामृतदिनी सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने दुकाने ही उशिरापर्यंत सुरू असतात.  

खरेदीसाठी शुभ मुहूर्त
गुरुपुष्यामृत दिनी अनेक लोक हे सोनं, चांदी खरेदी अथवा इतर शुभ कामे करीत असतात. या दिनी देखील काही वेळ ही खरेदीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यात उद्या (९ नोव्हेंबर) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी शुभ मुहूर्तास सुरवात होणार असून हा मुहूर्त शुक्रवारी (१० नोव्हेंबर) पहाटे सूर्योदयापर्यंत असणार आहे. या कालावधीत खरेदी करणे फलदायी ठरेल.

लक्ष्मीच्या शिक्‍क्‍यांना मागणी
गुरुपुष्यामृत हा योग अत्यंत लाभदायक असल्याने ग्राहक काहीनाकाही वस्तूची खरेदी ही करतच असतात. त्यातच दिवाळीत महिलांनी सोन्याच्या मोठ्या वस्तूंची खरेदी केली असल्याने आता त्यांची लहान वस्तूंना पसंती आहे. यात खासकरून चांदीच्या शिक्‍क्‍यांना ग्राहकांची अधिक पसंती असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली.

गुरुपुष्यामृत योगावर अनेक नागरिक सोने खरेदी करणे पसंत करतात. हा अतिशय शुभयोग आहे. हा योग उद्या (९ नोव्हेंबर) दुपारी सुरू होत आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू राहील. खास विविध प्रकारचे दागिने, लक्ष्मीमातेचे सोन्या- चांदीचे शिक्के तयार आहेत. 
- नितीन बिरारी, सराफ व्यावसायिक, जळगाव

Web Title: jalgaon news gold purchasing