जीएसटीपोटी मनपाला 8 कोटींचा निधी मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

जळगाव - देशभरात एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेस एलबीटीचा मिळणारा निधी बंद झाला. यामुळे जीएसटीपोटी शासनाकडून आठ कोटी 74 लाखाचे अनुदान मंजूर झाले असून याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळाले आहे. 

राज्यातील महापालिकांमध्ये स्थानिक संस्था करप्रणाली लागू होती. ही करप्रणाली बंद केल्यानंतर महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून त्यापोटी अनुदान दिले जात होते. परंतु जीएसटी लागू झाल्याने सर्व कर प्रणाली रद्द झाली. त्यामुळे एलबीटी ऐवजी जीएसटीचे अनुदान महापालिकेला दिले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याचे जीएसटीपोटी आठ कोटी 74 लाखाचे अनुदान जळगाव महापालिकेला मंजूर झाले आहे. याबाबतचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. महापालिकेतील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्याचे थकलेले वेतन मिळालेल्या अनुदानातून दिले जाणार असल्याचे समजते आहे. 

Web Title: jalgaon news GST