हॉकर्स स्थलांतराची ‘मनपा’ची कार्यवाही योग्यच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

जळगाव - महापालिकेतर्फे शहरात राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हॉकर्सकडून विरोध झाल्याने महापालिका प्रशासनातर्फे औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज अंतिम सुनावणी झाली. सुनावणीत दोन्ही पक्षांतर्फे बाजू ऐकून न्यायाधीशांनी महापालिकेने हॉकर्सवर स्थलांतराची कार्यवाही नियमानुसार व योग्य सुरू आहे. तसेच यावर स्थगिती नसल्याने महापालिकेने हॉकसचे स्थलांतर करावे, असे आदेश आज दिले. त्यामुळे हॉकर्स स्थलांतर करण्याचा महापालिकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

महापालिका प्रशासनातर्फे सुभाष चौक, बळिराम पेठ, शिवाजी रोडवरील विरोध करणाऱ्या हॉकर्सच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. न्यायाधीश आर. एम. बोर्डे, व्ही. व्ही कनकनवाडी यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यात महापालिकेतर्फे ॲड. पी. आर. पाटील यांनी बाजू मांडली. यापूर्वी झालेल्या अंतिम सुनावणीत महापालिकेने कारवाई नियमानुसार सुरू असल्याचे सांगितले, तसेच त्यांना पर्यायी जागेवर सर्व सुविधा देऊन जागावाटप प्रमाणपत्र दिले जात आहे. तसेच स्थलांतरास विरोध हॉकर्स करून कर्मचाऱ्यांना मारहाण करून ते न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचा युक्तिवाद केला होता. दरम्यान, ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीश आर. एम. बोर्डे व व्ही. व्ही. ककनवाडी यांनी महापालिकेची स्थलांतराची कार्यवाही योग्य ठरवत त्यावर कोणतीही स्थगिती नसल्याने महापालिका हॉकर्सचे स्थलांतर करू शकते, असे आदेश दिले. सुनावणीवेळी अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिकारी एच. एम. खान उपस्थित होते.

अतिक्रमण निर्मूलन मोहीम अधिक तीव्र करणार
औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर आता महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असल्याच्या कारणावरून विरोध करणाऱ्या विक्रेत्यांना आता स्थलांतरित केले जाणार आहे. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू असून, न्यायालयाने आज दिलेल्या आदेशावरून कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे अतिक्रमण अधीक्षक खान यांनी सांगितले. 

ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर विक्रेत्यांचे स्थलांतर
महापालिकेने यापूर्वी सुभाष चौक, बळिरामपेठ, शिवाजी रोड येथील फळ, भाजीपाला आदी विक्रेत्यांना गोलाणी मार्केट, न्यू बी. जे. मार्केट, भास्कर मार्केट आदी ठिकाणी पर्यायी जागा दिली होती. परंतु त्याला विरोध केल्यानंतर महापालिकेने महासभेत ठराव करून ख्वाजामियाँ झोपडपट्टीची मोकळी जागा तात्पुरत्या स्वरूपात दिली आहे. तेथे अनेक भाजी- फळ विक्रेते बसलेले असून, आता उर्वरित विक्रेत्यांना तेथे आता स्थलांतर करावे लागणार आहे.

Web Title: jalgaon news hockers migration municipal crime