अनैतिक संबंधातून बोरअजंटीत जेठ-भावजयची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

चोपडा (जळगाव): बोरअंजटी (ता. चोपडा) येथील नात्याने जेठ- भावजय असलेल्या दोघांनी अनैतिक संबंधातून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे निदर्शनास आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून, ती पोलिसांनी हस्तगत केली आहे. या चिठ्ठीतून त्यांच्या अनैतिक संबंधाचा उलगडा झाला आहे.

सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेल्या बोरअंजटी गावातील रहिवासी शिवदास भिका कोळी (वय 28, जेठ) व त्याच्या लहान भावाची पत्नी भारती रोहिदास कोळी (वय 19, भावजय) यांचे अनैतिक संबंध होते. त्यांनी आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास बोरअजंटी गावाबाहेरील वनविभागाच्या हद्दीजवळील त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पंचनामा करताना त्यांना दोन-तीन चिठ्ठ्या शिवदासच्या खिशात आढळल्या. त्यातील एका चिठ्ठीत 'आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, म्हणून आत्महत्या करीत असून, यास कुणालाही जबाबदार धरू नये' असे म्हटले आहे. दोन्ही भाऊ एकत्र राहात असून, बोरअजंटीत शेतीकाम करीत होते.

Web Title: jalgaon news Immoral relationship and suicide

टॅग्स