जळगाव बाजार समितीची जागा विकल्याप्रकरणी आज सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

जळगाव - तत्कालीन बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांनी समितीच्या मालकीची कोट्यवधींची जागा नियमबाह्यपणे विकून त्यातील रकमेतून मोठा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीची अप्पर आयुक्त तथा सहकारी संस्थेच्या विशेष निबंधकांनी दखल घेत प्रकरणाच्या चौकशीची आदेश दिले आहेत. याबाबत आज (४ ऑगस्ट) तालुका उपनिबंधकांकडे सुनावणी होणार आहे.

१९९९ मध्ये बाजार समितीचे तत्कालीन सभापती दुर्गादास दामू भोळे, नगरपालिका प्रतिनिधी प्रदीप रायसोनी व संचालकांनी बाजार समितीच्या मालकीची अजिंठा रोडवरील शेत सर्व्हे क्रमांक २६/१/२ जागा सातपुडा ऑटोमोबाईल व राम मोटर्स (आताचे आदित्य होंडा) या शोरूमच्या मालकांना मालकीहक्काने विकली होती. सहकार विभागाचे सर्व नियम लागू असताना, बाजार समितीला अशा प्रकारे जागा विकता येत नाही, तरीही हा व्यवहार करण्यात आला आणि त्यातून मिळालेल्या कोट्यवधींच्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप साबळेंनी केला असून, त्यासंबंधी सहकार संस्थेचे अप्पर आयुक्त सुनील पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीची दखल घेत प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांना आदेश दिले असून, त्यानुसार उद्या साबळेंना यासंदर्भात होणाऱ्या सुनावणीसाठी बोलाविण्यात आले आहे. 

बाजार समितीने सध्याच्या गोलाणी व्यापारी संकुल व महापालिका इमारत असलेली जागाही तत्कालीन पालिकेस अशाच प्रकारे नियमबाह्यपणे विकली होती. यासंबंधी गैरव्यवहाराचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आज काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत साबळेंनी केली.

Web Title: jalgaon news Jalgaon bazar samiti