गाळेधारकांचा प्रशासनाविरोधात मुकमोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

व्यापार बंद ठेवून केला निषेध; परिवारातील सदस्यांचाही सहभाग, गोलाणीत दुकान बंदचे आवाहन

जळगाव: महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या वीस व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्‍न चिघळला असून, महापालिका प्रशासनाच्या ई-लिलाव व गाळेभाडे, मालमत्ताकराच्या अवाजवी बिलांच्या विरोधात गाळेधारक आज रस्त्यावर उतरत बेमुदत व्यापार बंद ठेवण्याचा निर्धार करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. सदर मोर्चात गाळेधारकांच्या परिवारातील सदस्य देखील सहभागी झाले आहेत.

जळगाव महापालिका मालकीच्या वीस व्यापारी संकुलातील साधारण 2 हजार 387 गाळेधारकांची 2012 ला मुदत संपली आहे. यात न्यायालयाच्या आदेशानंतर पाच वर्षांपासून थकीत भाडे व मालमत्ताकराची बिले गाळेधारकांना देण्यात आली. परंतु पाचपट दंड व अवाजवी बिलांची आकारणी होत असून ती चुकीची असल्याचा दावा गाळेधारकांनी केला आहे. तसेच गाळ्यांचा ई- लिलाव न करता पुन्हा कराराने द्यावी अशी मागणी गाळेधारकांकडून होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली गाळे लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने त्याविरोधात सर्व गाळेधारकांनी आजपासून बेमुदत व्यापार बंदची हाक दिली आहे. शिवाय, प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकराच्या सुमारास मूकमोर्चा काढला. यात हजारो गाळेधारक सहभागी होवून प्रशासनाविरोधात बॅनर घेवून निषेध नोंदवत आहेत.

गोलाणी मार्केटमध्ये थोडा वाद
शहरातील सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट, गांधी मार्केट यासह अन्य मनपा मालकिच्या व्यापारी संकुलातील गाळेधारक मुकमोर्चात सहभागी होते. पण दुसरीकडे गोलाणी व्यापारी संकुलातील जवळपास सर्वच दुकाने सुरू होती. मोर्चात व्यापारी सहभागी झाले नसल्याने मोर्चातील काही सहभागी गाळेधारकांनी गोलाणी मार्केटामध्ये येवून दुकान बंद करण्याचे सांगून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत होते. यामुळे काही ठिकाणी किरकोळ वाद उद्‌भवले होते. पण, गाळेधारकांच्या या आवाहनाला गोलाणीतील व्यापाऱ्यांनी दुजोरा देत दुकान बंद करून मोर्चात सहभागी होते.

Web Title: jalgaon news jalgaon municipal market businessman rally