आणखी आठवडाभर राहणार सुवर्णबाजारात तेजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

जळगाव - नोटाबंदी, जीएसटी, वाढती महागाई यामुळे गेल्या सहा-आठ महिन्यांपासून बाजारात मंदी असल्याने त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने हवालदिल झालेल्या व्यावसायिकांनी दसरा-दिवाळीतील उलाढालीने बऱ्यापैकी दिलासा दिला. दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेली सुवर्णबाजारातील खरेदी आणखी आठवडाभर चालेल आणि हा व्यवसाय तेजीत राहील, असे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. जीएसटी, नोटाबंदीच्या निर्णयानंतरही यंदा सुवर्णबाजारात चांगली उलाढाल झाल्याचा दावाही केला जात असल्याने दिवाळीच्या प्रकाशपर्वात खरेदीपर्वही जोरात साजरे झाल्याचे बोलले जात आहे.

दिवाळीतील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीस शुभ मानली जाते. यामुळे दिवाळीत सोन्याची खरेदीस नागरिक पसंती देतात. जळगावची सुवर्ण बाजारपेठ अस्सल सोन्यासाठी ओळखली जाते. जळगाव जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात गेलेल्या सासुरवाशीण महिला भाऊबिजेसाठी आपल्या माहेरी आल्यानंतर सोने खरेदीसाठी येथील बाजारपेठेत गर्दी करतात. हे दरवर्षीचे चित्र असते. यंदाही तेच चित्र राहून सुवर्णबाजारातील उलाढाल वाढेल, असा अंदाज सराफ व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. महिला अन्‌ सोन्याचे दागिने यांचे नाते अजोड आहे. गरिबांतील गरीब महिलांपासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वच महिलांना सोन्याचे दागिने अंगावर घालावासे वाटतात. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदी, जुलैपासून सुरू झालेला ‘जीएसटी’ यामुळे सुवर्ण बाजारासह सर्वच व्यवसायात मंदीचे वातावरण होते. 

सोने खरेदीसाठी पॅन कार्डाची सक्ती, पन्नास हजारांवरील व्यवहार चेकने आदी अटी होत्या. यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांचा हिरमोड होत असे. याच महिन्यात केंद्र शासनाने दोन लाखापर्यंतचे सोने खरेदीस पॅन कार्डाची सक्ती गरजेची नसल्याचे स्पष्ट केली होते. यामुळे यंदाची दिवाळी सराफ व्यावसायिकांना लाभदायी ठरली. दिवाळी पाच दिवसाची असली तरी धनत्रयोदशी व पाडवा या दोन दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. या दिवशी ग्राहकांना शहरातील विविध सराफ व्यावसायिकांकडे जाऊन सोने खरेदी केले. कोट्यवधींची उलाढाल या दिवसात झाली आहे. त्याहीपेक्षा अधिक उलाढाल आगामी आठ ते दहा दिवसात होईल. आगामी काळात महिलांकडून मणी मंगळसूत्र, पोत, कानातील डूल, टॉप्स, बांगड्यांना अधिक मागणी असेल. जळगाव जिल्ह्यातून परजिल्ह्यात, पर राज्यात खानदेशातील अनेक माहेरवासीण महिला भाऊबिजेनिमित्त माहेरी आलेल्या आहेत. त्यात दोन लाखांपर्यंतच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्डाची गरज नाही. यामुळे सराफ व्यावसायिकांना हे दिवस सुगीचे ठरतील, अशी आशा आहे.

जीएसटी, नोटाबंदीचा परिणाम अल्पच
गतवर्षी दिवाळीत भाऊबिजेनंतर दहा दिवसात सुमारे चाळीस ते पन्नास कोटींची उलाढाल झाली होती. यंदाच्या दिवाळीच्या सणावर नोटाबंदी, ‘जीएसटी’ कराचे सावट आहे. मात्र दोन लाखांपर्यंतच्या खरेदीस पॅनकार्डाची गरज नाही. यामुळे दोन लाखापर्यंतचे सोने खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहील. शासकीय कर्मचाऱ्यांना मिळालेला सातवा वेतन आयोग, खासगी कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस यामुळे बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे. जीएसटी, नोटाबंदीचा फारसा परिणाम बाजारपेठेत दिसून येत नाही. उलाढाल चांगलीच होईल, अशी माहिती काही सराफ व्यावसायिकांनी दिली. 

Web Title: jalgaon news jewellery market fast