‘एलईडी’ पथदिव्यांनी शहर झगमगणार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

१५ कोटींचा मिळणार निधी; महापौर-जलसंपदामंत्र्यांमध्ये चर्चा
जळगाव - शहरातील सर्व भागांतील रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्यात येतील, तसेच ज्या ठिकाणी वीजखांब नाहीत, तेथे नवीन खांब उभे करण्यात येतील. यासाठी तब्बल पंधरा कोटींचा स्वतंत्र निधी ऊर्जा मंत्रालयाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत हमी दिल्याची माहिती महापौर ललित कोल्हे व माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी त्यांच्या भेटीनंतर दिली.

मंत्री गिरीश महाजन यांची आज जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात महापौर कोल्हे व माजी उपमहापौर महाजन यांनी भेट घेतली. यावेळी आमदार चंदूलाल पटेल हेही उपस्थित होते. याबाबत माहिती देताना सुनील महाजन यांनी सांगितले, की शहरातील विविध विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली. मात्र तो निधी तातडीने वापरावा, कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. 

पथदिव्यांसाठी १५ कोटी
शहरातील पथदिव्यांची समस्या सोडविण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडून तातडीने पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. यात शहरातील सर्व भागात एलईडी पथदिवे लावण्यात येतील, तसेच नवीन वस्तीच्या भागात पथदिव्यांसाठी पोल उभारण्यात येतील. यावेळी महाजन यांनी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. त्यांनीही तातडीने १५ कोटींचा निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जळगाव शहर एलईडी दिव्यांनी उजळून निघेल, असा विश्‍वासही महापौर ललित कोल्हे यांनी व्यक्त केला. तसेच जळगाव शहरातील काही प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीही शासनातर्फे स्वतंत्र निधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

आमदार भोळेंना विश्‍वासात घ्या
गिरीश महाजन यांनी महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी आहे. त्या काळापर्यंत कामासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना विश्‍वासात घेऊन काम करावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महापौर कोल्हे यांनी त्याबाबत ग्वाही दिली.

Web Title: jalgaon news led street light in jalgav