चाळीसगाव: बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील शेती शिवारात सोमनाथ अहिरे यांची शेती आहे. त्यांनी गुरुवारी(ता. 31) सायंकाळी गायींचे दुध काढले. शेतात तीन गायी व त्यांची वासरे बांधली होती. ते शुक्रवारी(ता. 1) शेतात आले असता, एक वासरु हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेले दिसले. वासराच्या खांद्याचा, मागील व पोटाखालचा भाग खाल्लेला होता.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : पिंपळवाड म्हाळसा(ता. चाळीसगाव) येथील शेती शिवारात गुरुवारी(ता. 31) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरु ठार झाले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील शेती शिवारात सोमनाथ अहिरे यांची शेती आहे. त्यांनी गुरुवारी(ता. 31) सायंकाळी गायींचे दुध काढले. शेतात तीन गायी व त्यांची वासरे बांधली होती. ते शुक्रवारी(ता. 1) शेतात आले असता, एक वासरु हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेले दिसले. वासराच्या खांद्याचा, मागील व पोटाखालचा भाग खाल्लेला होता. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी तत्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजाळ यांनी वासराचे शवविच्छेदन केले. वनरक्षक प्रकाश पाटील व वनकर्मचारी यांनी पंचनामा केला. दरम्यान या भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

पिलखोडला बिबट्याचे दर्शन...
पिलखोड(ता. चाळीसगाव) शेती शिवारातही अनेक शेतकऱ्यांना व शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. चाळीसगाव रस्त्यालगतच्या शेतात सकाळच्या सुमारास तर कधी देशमुखवाडी रस्त्यालगतच्या शेतांमध्ये सायंकाळच्या सुमारास बिबट्याला पाहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ऐन शेतात कामाचे दिवस असल्याने बिबट्याच्या भितीपोटी शेतात कोणीच जाण्यास धजावत नाही. यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भिती पसरली आहे. दरम्यान शुक्रवारी(ता. 1) सकाळी तामसवाडी व पिलखोड येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यापासून संरक्षण करण्यासंदर्भातील पत्रके जरी वाटली असली, तरी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Jalgaon news leopard attack in chalisgaon