उपखेड येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला

दीपक कच्छवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): उपखेड (ता. चाळीसगाव) येथील शिवारात आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेतात कापूस वेचत असणार्‍या महिलेवर हल्ला केला. त्यात त्या जखमी झाल्या असून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

उपखेड येथील नगराज त्र्यंबक पाटील यांची सुन गायत्री सुरेश पाटील (वय 37) यांच्यावर शेतात कापूस वेचत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास हल्ला केला. बिबट्याने मानेला व पाठीला नखाने ओरबाडून जखमी केले आहे. सुदैवाने त्या बचावल्या असून, चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: jalgaon news leopard attacked the women in upkhed