शासनाच्या परिपत्रकानुसार कामांची यादी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

जळगाव - शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीतील कामांची यादी शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधा विकासाच्या परिपत्रकानुसार तयार केली होती. यात प्रामुख्याने पथदिवे, गटारी आदी कामांचा समावेश आहे. ही यादी विभागीय आयुक्तांकडे पाठविली होती. हा निधी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी वापरला जाणार असल्याचे मत प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी व्यक्त केले. 

शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीचे नियोजन प्रश्‍न वर्षभरापासून सत्ताधारी व विरोधक यांच्या समन्वयाने झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी यांची बैठक होऊन या निधीतील कामांचे १३ विविध प्रकारच्या नियमावलीनुसार विभाजन करून यादी तयार केली होती. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रशासकीय स्तरावर देखील यादीची पडताळणी करून कामांची निवड केली होती.

शासनाच्या परिपत्रकानुसार हा निधी शहरात मूलभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे. कोणाच्या वॉर्डात कमी, जास्त निधी देण्याचा हेतू प्रशासनाचा नाही, असे अप्पर आयुक्तांनी सांगितले.

मूलभूत सुविधांची गरज
महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यातच वर्षभरापासून मिळालेल्या २५ कोटींच्या निधीतून शहरात विकासकामे झालेली नाही. त्यामुळे समन्वयाने सत्ताधारी व विरोधकांनी कामांचे नियोजन करण्याची गरज आहे, असे अप्पर आयुक्तांनी सांगितले.

Web Title: jalgaon news A list of works according to the government circular