‘मध्य प्रदेश परिवहन’च्या तीन बसवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

जळगाव - मध्य प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला परवानगी नसताना राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकांत आणल्या जातात. अशा बसच्या कागदपत्रांची तपासणी करीत परवान्याची मुदत संपलेल्या तीन बस आगारात जमा करण्याची कारवाई आज जळगाव विभागीय कार्यालयातर्फे करण्यात आली.

मध्य प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला एसटी महामंडळाच्या बसस्थानकात येऊन प्रवासी नेण्याची परवानगी नाही. तरी देखील या बस थेट बसस्थानकात येऊन प्रवासी नेत असतात. त्यामुळे या बस अडविण्यावरून अनेकदा वादही झाले आहेत. मुळात या बस अपूर्ण कागदपत्र, परवान्यांची मुदत संपलेली असताना अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करीत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या वतीने तपासणी केली जात असते. 

या मोहिमेअंतर्गत जळगाव विभागाच्या वतीने बसस्थानक आलेल्या बसची तपासणी केली असता, खोटे अपूर्ण कागदपत्र आणि परवाना संपल्याचे निदर्शनास आले. अशा तीन बस जळगाव आगारात जमा करण्यात आल्या आहेत. बसमधील संबंधित चालक- वाहक यांना कागदपत्र आणून दाखविण्याचे सांगण्यात आले असून ते कागदपत्र आणल्याशिवाय बस सोडण्यात येणार नसल्याचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news Madhya Pradesh Transportation