शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी पोलिस अधीक्षकांचा संवाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जळगाव - दिवाळीचे औचित्य साधत जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज कर्तव्यावर शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. दिवाळीनिमित्त पोलिस दलातर्फे भेट आणि पोलिस अधीक्षकांनी कुटुंबाची केलेली आस्थेवाइक चौकशी या परिवारांना हायसे करून गेली. 

सकाळी पोलिस हुतात्मा दिनाचा शासकीय कार्यक्रम संपल्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात कार्यक्रम झाला. जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी आज पोलिस अधीक्षक कराळे यांनी संवाद साधला. अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी रशीद तडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, कार्यालयीन अधीक्षक नागेश हडपे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कुटुंबप्रमुखांशिवाय या कुटुंबीयांत दिवाळी कशी साजरी होत असावी, या एका प्रश्‍नाची उकल केली. पोलिसांच्या कुटुंबीयांना एकत्र आणत प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या भावभावना, मुलांची शैक्षणिक प्रगतीची आस्थेने चौकशी करीत असताना अधिकाऱ्यांचाही स्वर दाटून आला होता. 

विधवांसह अनाथांना आधार! 
पोलिस दलासाठी प्राणार्पण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मुलांशी व्यक्तिशः संवाद साधत अडीअडचणी, शिक्षण, विवाह यांची माहिती पोलिस अधीक्षकांनी घेतली. जेव्हाही गरज वाटेल तेव्हा संपूर्ण पोलिस दल आपल्या पाठीशी असल्याचे आश्‍वासनही त्यांनी कुटुंबीयांना दिले. 

Web Title: jalgaon news Martyr Police