विधानसभा निवडणुकीच्या  मतमोजणीची तयारी पूर्ण 

kfn
kfn

विधानसभा निवडणुकीच्या 
मतमोजणीची तयारी पूर्ण 

जळगाव  ः जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात काल (ता. 21) सरासरी 60.90 टक्के मतदान झाले असून उद्या (ता. 24) मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून 1254 अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त केले आहे. मतमोजणी संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

गुरुवारी (ता. 24) सकाळी आठला संबंधित मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरवात होईल. मतमोजणी एकावेळी 14 टेबलवर 14 केंद्राची होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्ह्यात 176 मतमोजणी सुपरवायझर, 176 मतमोजणी सहायक, 33 रो अधिकारी, 44 सुविधा कर्मचारी, 88 टॅबुलेशन कर्मचारी, 11 मीडिया को ऑडिनेशन, 55 पोस्टल मतमोजणी सुपरवायझर, 55 पोस्टल मतमोजणी सहायक, 220 सूक्ष्म निरीक्षक, इतर कर्मचारी कार्यरत राहतील. प्रत्येक मतदार संघासाठी एक मतमोजणी निरीक्षक, त्यांच्या अधिनस्त सूक्ष्म निरीक्षकही मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहे. 

सकाळी आठला सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होईल. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्‍चित केलेल्या टेबलवर रॅंडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. याकरिता 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहे. 

विधानसभा क्षेत्रनिहाय फेऱ्या 
चोपडा- 23 फेऱ्या, रावेर- 22, भुसावळ- 22, जळगाव शहर- 26 
जळगाव ग्रामीण- 23, अमळनेर- 23, एरंडोल- 21, चाळीसगाव- 24, पाचोरा- 23, जामनेर- 23, मुक्ताईनगर-23 


मतमोजणीची ठिकाणे अशी ः 
चोपडा : महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडाऊन क्रमांक 2, चोपडा 
 रावेर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर 
 भुसावळ : प्रशासकीय इमारत, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ 
 जळगाव शहर : महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडाऊन क्रमांक 26, जळगाव 
 जळगाव ग्रामीण : महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडाऊन क्रमांक 2, धरणगाव 
 अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर 
 एरंडोल : डीडीएसपी कॉलेज, तरण तलावाजवळ, एरंडोल 
 चाळीसगाव : वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव 
 पाचोरा : गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडाऊन क्रमांक 3, पाचोरा 
 जामनेर : शासकीय खाद्यनिगम गोडाऊन क्रमांक 3, जामनेर 
 मुक्ताईनगर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com