गुलाबराव पाटलांच्या  मुलावर दुसरा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

गुलाबराव पाटलांच्या 
मुलावर दुसरा गुन्हा दाखल 

गुलाबराव पाटलांच्या 
मुलावर दुसरा गुन्हा दाखल 

जळगाव : शिवसेना नेते तथा विद्यमान सहकार राज्यमंत्री महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या मुलावर निवडणूक काळात चोवीस तासांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना मारहाणीनंतर मतदान सुरू असताना केंद्राच्या शंभर मीटर आत प्रचार करताना आढळून आल्याने प्रताप पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 
भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शुक्रवारी (ता. 18) मध्यरात्री मारहाण करून वाहनाच्या काचा फोडल्या प्रकरणी दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 19) जिल्हा परिषद सदस्य तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रताप पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोवर सोमवारी (ता.21) मध्यरात्री दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळधीत सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालय या मतदान केंद्रात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शंभर मीटरच्या आत प्रचार करताना आढळून आल्याच्या तक्रारीवरून प्रताप पाटील, योगेश नारायण सोनवणे आणि रफीक शेख अशा तिघांच्या विरुद्ध निरीक्षक बापू रोहोम यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
...... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news matri patil mulavar gunha dahakal