वैद्यकीय महाविद्यालयाच्या 109 पद भरतीस मान्यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जळगाव - उत्तर महाराष्ट्रातील पहिले "शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) सुरू करण्यासाठी आवश्‍यक 109 पदांच्या निर्मितीस शासनाने मान्यता दिली असून, भरती प्रक्रियेस लवकरच सुरवात होणार आहे.

राज्य सरकारने 25 एप्रिल 2017 ला मेडिकल हब जळगावला सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 2018 मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. येथे एकूण 100 विद्यार्थ्यांना सुरवातीस प्रवेश देण्यात येईल. सोबतच 500 रुग्ण खाटांचे रुग्णालयही सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: jalgaon news medical college 109 seats recruitment permission