हिंदू आतंकवाद दाव्याचा करणार सभेत भांडाफोड - सुनील घनवट

हिंदू आतंकवाद दाव्याचा करणार सभेत भांडाफोड - सुनील घनवट

जळगाव - वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी अनेक हिंदूंचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्यात आले आहे. या घटनांमधील दाहक सत्य जनतेसमोर मांडून हिंदू आतंकवाद दाव्याचा भांडाफोड करण्यासाठी हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन १९ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित पत्रपरिषदेला सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, प्रशांत जुवेकर उपस्थित होते. घनवट यांनी सांगितले, की जळगावात २००८ पासून हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा जळगावात होणारी ६१ वी धर्मजागृती सभा १९ नोव्हेंबरला शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी साडेपाचला होणार आहे. यात प्रामुख्याने हिंदूंना आतंकवादी ठरविण्याचे षड्‌यंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हिंदू आतंकवाद अस्तित्वात नसताना तो आणला जात आहे. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसताना केवळ हिंदूंना लक्ष केले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने त्यांच्याकडे कोणत्याच हिंदुत्ववादी संघटनेचे नाव हत्या प्रकरणी नसल्याचे घोषित केले आहे. पण यात आर्थिक हितसंबंध पाहिल्यास खरे गुन्हेगार सापडतील, असे त्यांनी सांगितले. धर्मजागृती सभेत हिंदू आतंकवाद दाव्यांचा भंडाभोड करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे हिंदुत्ववादी अधिवक्‍ता तसेच हिंदू विधिज्ज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर, केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि २००८ च्या मालेगाव स्फोट खटल्यात आठ वर्ष नाहक कारावास भोगावा लागलेले निरपराध सुधाकर चतुर्वेदी हे प्रमुख वक्‍ता असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com