'मिसेस बेस्ट आय' स्पर्धेत प्रा. मोनिका मुंदडा प्रथम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मिळालेला 'मिसेस बेस्ट आय' नागरिकांना समर्पित आहे. आगामी काळात अंधांना दृष्टी लाभावी, त्यांना जग पाहता यावे यासाठी आपण नेत्रदानासाठी विविध शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. 
- प्रा. मोनिका मुंदडा, 'बेस्ट आय' विजेत्या, मिसेस अर्थ स्पर्धा. 

अमळनेर : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या मिसेस इंडिया अर्थ 2017- 18 स्पर्धेत येथील प्रा. मोनिका मुंदडा यांनी 'बेस्ट आय' किताब पटकावला आहे. औरंगाबाद व अमळनेरला त्यांनी बहुमान मिळवून दिला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्तर महाराष्ट्रतून त्या एकमेव महिला ठरल्या आहेत. 

न्यू दिल्ली येथे सहा ऑक्‍टोबरला आयटीसी वेलकम हॉटेल येथे अंतीम स्पर्धा झाली. या स्पर्धेत साडेचार हजार महिला सहभागी झाल्या होत्या. यातून अंतीम फेरीत अवघ्या 25 होत्या. त्यात बेस्ट आयसाठी स्पर्धा झाली. यात प्रा. मोनिका मुंदडा यांनी हा किताब पटकावला आहे. गेल्या सहा महिन्यापासून ही स्पर्धा सुरू होती. यात श्रीमती प्रा. मुंदडा यांनी टप्प्या- टप्प्याने कठीण पातळी ओलांडून मिसेस बेस्ट आय किताब पटकावला आहे. 

श्रीमती प्रा. मुंदडा या औरंबाद येथील उद्योजक भिकमचंद मल यांच्या कन्या आहेत. अमळनेर त्यांचे सासर असून, त्यांचे पती प्रशांत राजीव मुंदडा कपड्यांचे ख्यातनाम व्यापारी आहेत. प्रा. मुंदडा या येथील प्रताप महाविद्यालयात संगणक विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. भारतवासियांचे लक्ष लागून असलेल्या मिसेस अर्थ या स्पर्धेत त्यांनी मानाचा किताब पटकावला असून, उत्तर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेला त्यांचे पती प्रशांत मुंदडा यांनीही हजेरी लावली आहे. त्यांचे वडील भिकमचंद मल, सासरे राजीव मुंदडा, पुत्र जीत मुंदडा आदींसह मित्र परिवाराचे त्यांना यासाठी प्रोत्साहन लाभले आहे. आगामी काळात युवती व महिलांना त्यांचे यश निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

मिळालेला 'मिसेस बेस्ट आय' नागरिकांना समर्पित आहे. आगामी काळात अंधांना दृष्टी लाभावी, त्यांना जग पाहता यावे यासाठी आपण नेत्रदानासाठी विविध शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. 
- प्रा. मोनिका मुंदडा, 'बेस्ट आय' विजेत्या, मिसेस अर्थ स्पर्धा. 

Web Title: Jalgaon news miss India Earth competition Monica Mundada