एरंडोल येथे दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

विहिरीत उडी घेवून संपविली जीवनयात्रा; 14 महिन्याच्या बालिकेचा समावेश

जळगावः जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सदर घटना आज (गुरुवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून, यात अवघ्या 14 महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे.

तळई (ता. एरंडोल) येथील माहेर असलेल्या शितल नरेंद्र महाजन (वय 27) हिचा विवाह एरंडोल येथील नरेंद्र महाजन याच्यासोबत झालेला होता. त्यांना मुलगा तेजस (वय 7) आणि मुलगी साधना (वय 14 महिने) हे दोन अपत्य होते. आज सकाळी शितल महाजन या आपल्या दोन्ही मुलांसह घराच्या बाहेर पडली असता, एरंडोलपासून सहा किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गपासून जवळच असलेल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत दोन्ही मुलांसह उडी घेवून जीवनयात्रा संपविली. सदर घटना सकाळी दहा- साडेदहाच्या सुमारास घडली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून तिघांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

सासऱ्याच्या मंडळींकडून त्रास होत असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप माहेच्या मंडळींकडून केला जात आहे. या घटनेनंतर शितल महाजन यांचे पती नरेंद्र महाजन याच्यासह सासू, सासरे आणि दीर हे स्वतःहून पोलिस ठाण्यात जमा झाले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: jalgaon news Mother's suicide with two children in Erandol