‘महावितरण’तर्फे कुसुंब्यात  २९ वीजचोरांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

जळगाव - ‘महावितरण’तर्फे वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत कुसुंबा (ता. जळगाव) गावात आज झालेल्या तपासणीत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या २९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच गावात केलेल्या पाहणीनंतर लघुवीजदाबाचे वीस खांब उभारणीचे नियोजनदेखील करण्यात आले.

‘महावितरण’कडून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत आकडेधारक, मीटरमधील फेरफारची तपासणी करण्यासोबत मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीने घेतलेल्या रीडिंगमधील पाच टक्‍के मीटरची तपासणीदेखील केली जात आहे. यात दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कुसुंबा येथे आज जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्या आदेशावरून तपासणी करण्यात आली. 

मोहिमेत जळगाव ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता सतीश पाटील, उपकार्यकारी अभियंता एस. के. पाटील, चिंचोली उपविभागाचे कनिष्ठ अभियंता संकेत राऊत यांच्यासह कनिष्ठ अभियंता मुकेश ठाकरे, कुणाल महाजन, कनिष्ठ अभियंता प्रतिभा पाटील व प्रतीक्षा गावंडे यांनी कारवाई केली. यात श्रद्धा कन्स्ट्रक्‍शन व व्ही. डी. कन्स्ट्रक्‍शन तसेच नारायण पाटील, कविता पाटील, विमलबाई राठोड यांच्यासह २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: jalgaon news mseb

टॅग्स