मेहुणीचा मुलगा, पत्नीचा खून करून एकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पिंपळगाव बसवंत - मेहुणीचा मुलगा व पत्नीचा खून करून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार येथील पवननगर भागात उघडकीस आला. अनैतिक संबंधांच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मूळचा भुरसड (ता. धुळे) येथील रहिवासी असलेला रवींद्र भटू नागमल (वय 35) हा पत्नी सुरेखा (27) व मुलगा अमोल यांच्यासह गेल्या सात वर्षांपासून येथील चिंचखेड रस्त्यावर वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी गवंडीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. साधारण पंधरा दिवसांपूर्वीच त्याने पवननगरमध्ये भाड्याची खोली घेतली होती. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून सुरेखा नागमल यांच्या बहिणीचा मुलगा विशाल विजय पानपाटील (10) शिक्षणासाठी त्यांच्याकडे राहायला आला होता. पिंपळगावच्या प्राथमिक शाळेत त्याने चौथीत प्रवेश घेतला. रविवारी (ता. 25) रात्री रवींद्र व त्याचे कुटुंबीय जेवणानंतर झोपले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास रवींद्रने पत्नी सुरेखाच्या डोक्‍यात हातोड्याने वार केला. घाव मेंदूला लागल्याने सुरेखाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने विशालचा पट्ट्याच्या सहायाने गळा दाबून खून केला व नंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा अमोलला मात्र कोणतीही दुखापत झालेली नाही. 

Web Title: jalgaon news murder

टॅग्स