पिंप्राळा तलाठी कार्यालयाला  हार घालून ‘गांधीगिरी’!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

जळगाव - पिंप्राळा उपनगरातील तलाठी कार्यालय पंधरा दिवसांपासून बंदच आहे. सध्या शाळा- महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी लागणारे विविध दाखले मिळविण्यासाठी उपनगरातील रहिवाशांना शहरातील रथ चौकातील तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. परिणामी दाखले मिळविण्यासाठी रहिवाशांची दमछाक होत आहे. त्यामुळे काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तलाठी कार्यालयाला हार घालून ‘गांधीगिरी’ करत आंदोलन करण्यात आले.

पिंप्राळ्याच्या मुख्य रस्त्यालगतच तलाठी कार्यालय आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ते बंदच आहे. शाळा- महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी नागरिकांची पाल्यांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी लगबग सुरू होते. त्यासाठी रोजच नागरिक सकाळपासूनच तलाठी कार्यालयाजवळ तासन्‌तास उभे राहून ते उघडण्याची प्रतीक्षा करतात. मध्यंतरी तहसील प्रशासनाने तेथील नागरिकांना रथ चौकातील तलाठी कार्यालयात विविध दाखले काढण्यासाठी आवाहन केले होते. त्यामुळे उपनगरातील नागरिकांची तेथे विविध दाखले काढण्यासाठी धावपळ दिसून आली. काल  येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बंद तलाठी कार्यालयाच्या शटरवर हार घालून नारळ वाढवत ‘गांधीगिरी’ करण्यात आली.

काल सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, अतुल बारी, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, महापालिकेचे गटनेते सुरेश सोनवणे, नगरसेविका प्रतिभा कापसे, शोभाताई बारी, मुक्तारबी पठाण, लता मोरे, नगरसेवक शरीफ पिंजारी आदींनी तलाठी कार्यालयासमोर विविध घोषणा दिल्या. कार्यालयाच्या शटरला हार घालून नारळ वाढविले. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांना तलाठी कार्यालय बंदमुळे नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली.

पिंप्राळा उपनगरातील तहसील कार्यालयात नियमित तलाठी परीक्षेसाठी रजेवर होते. दुसरे तलाठी नेमण्यात आले. त्यांची शासकीय परीक्षा असल्याने तेही सुटीवर आहेत. आजच तलाठी संदीप ढोबळ यांची नेमणूक केली अाहे.

- अमोल निकम, तहसीलदार

Web Title: jalgaon news ncp