कर भरूनही सुविधा मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जळगाव - शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरातील आरएमएस कॉलनीत पाणी, रस्ते, गटारी नसल्याचा त्रास नागरिकांना गेल्या तीस वर्षांपासून सहन करावा लागत आहे. मोकळ्या जागेत साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत परिसरातील महिलांनी आज थेट महापालिकेत जाऊन महापौरांकडे व्यथा मांडल्या. तसेच नियमित कर भरूनही सुविधा मिळत नसल्याबाबत निवेदन दिले. 

यावेळी महापौर नितीन लढ्ढा यांनी महिलांशी चर्चा करून उद्याच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठवून या परिसरात त्वरित तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्‍वासन दिले. तसेच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना महापौरांनी दिल्या. 

वीजतारा बनल्या धोकादायक 
आरएमएस कॉलनीसह परिसरातील काही भागांत वीज खांब अजूनपर्यंत गेलेले नाहीत. तसेच काही ठिकाणी वीज खांबांचे अंतर जास्त असल्याने वीज तारा लोंबकळत असून धोकादायक बनल्या आहेत. पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी तर महिला, वृद्ध व लहान मुलांना घराच्या बाहेर पडणे अवघड बनले असल्याचे महिलांनी महापौरांना सांगितले. यावेळी महापौरांनी वीज अभियंता एस. एस. पाटील यांना बोलावून प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. अभियंता पाटील यांनीही ‘महावितरण’शी बोलून हा प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असे सांगितले. 

तात्पुरती सुविधा तरी द्या
नियमित कर भरतो, पण आम्हाला सुविधा दिली जात नाही, अशी कैफियत महिलांनी महापौरांकडे मांडली. महापौर लढ्ढा यांनी अमृत योजनेचे काम न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे महिलांना सांगितले. अमृत योजनेची कामे शहरात प्रस्तावित असल्याने रस्ते, गटारी, पाणी यांची कामे करता येणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी महिलांनी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून रस्ते, कच्च्या गटारी, पथदिवे बसवावे, अशी मागणी महापौरांकडे केली.

आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर
रस्ते, गटारी नसल्याने आरएमएस कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून, रस्ते नसल्याने पाठीचे दुखणे सुरू झाले असल्याची तक्रार महिलांनी केली. मोकळ्या जागांवर मोठमोठे गवत उगवले झाले असून, साप, विंचू आदींचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भावही जाणवत असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

अधिकारी आज पाहणी करणार 
महापौर लढ्ढा यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके व वीज अभियंता एस. एस. पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी महापौरांनी खडके, पाटील यांना शहर अभियंता सुनील भोळ व आरोग्य निरीक्षक यांना सोबत घेऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित अधिकारी उद्या (२३ ऑगस्ट) परिसराची पाहणी करतील. 

Web Title: jalgaon news no facility after tax give