पाचोरा येथे संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पाचोरा (जळगाव) : येथील संभाजीनगरात असलेल्या उर्दू माध्यमाच्या मूले व मूलींच्या शाळेला संतप्त पालकांनी आज (सोमवार) सकाळी क़ूलूप ठोकले. त्यामूळे शिक्षक व विद्यार्थांना बाहेर व्हरांड्यात मातीत बसावे लागले. या प्रकारामूळे खळबळ उडाली.

पाचोरा (जळगाव) : येथील संभाजीनगरात असलेल्या उर्दू माध्यमाच्या मूले व मूलींच्या शाळेला संतप्त पालकांनी आज (सोमवार) सकाळी क़ूलूप ठोकले. त्यामूळे शिक्षक व विद्यार्थांना बाहेर व्हरांड्यात मातीत बसावे लागले. या प्रकारामूळे खळबळ उडाली.

संभाजीनगरातील मूले व मूलींची सर्वात मोठी जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची शाळा आहे. १ ते ७ पर्यंतचे वर्ग येथे असून, सूमारे ९०० विद्यार्थी विद्यार्थीनी येथे आहेत. येथे १० शिक्षक नियुक्तीस होते. प्रथमच शिक्षक संख्या कमी असतांना २ शिक्षकांची बदली करण्यात आली, त्यामूळे एका शिक्षकाला २-३ वर्ग सांभाळावे लागतात. परिणामी, विद्यार्थांना न्याय मिळत नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होते म्हणून बदली केलेल्या शिक्षकांना पुन्हा परत पाठवावे अथवा नवीन दोन शिक्षक द्यावेत व विद्यार्थांना न्याय द्यावा, अशी मागणी पालकांकडून गेल्या काही महिन्यांपासून केली जात आहे.

शिक्षण विभागाच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तशा तक्रारी, निवेदने देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणा करीत राहिली. एकीकडे शासन प्रत्येकाला शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न व देखावा करीत आहे. दूसरीकडे जे विद्यार्थी शाळेत त्यांना शिक्षण देण्यासाठी पुरेसे शिक्षक दिले जात नाहीत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट्न व विनवण्या करून उपयोग होत नाही, या विचाराने आज सकाळी विद्यार्थां पाठोपाठ काही पालक शाळेत आले. त्यांनी केंद्र प्रमूख व मुख्याध्यापकांना जाब विचारला शिक्षक मिळत नसल्याचे कळाल्याने शिवसेना अल्प संख्य आघाडीचे अध्यक्ष शेख जावेद यांचे सह पालकांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर काढून सर्व खोल्यांना कुलूप ठोकले, त्यामूळे खळबळ उडाली.

शाळा सुटे पर्यंत सर्व शिक्षक विद्यार्थी बाहेर व्हरांड्यात बसून राहिले. तो पर्यंत शिक्षण विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी तिकडे फिरकला नाही. पूरेसे शिक्षक मिळत नाहीत तो पर्यंत शाळा खोल्या बंदच रहातील व आमचे आंदोलन सुरू राहिल, असे शेख जावेद यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: jalgaon news parents locked the school at Pachora