रस्तेदुरुस्तीसाठी शासनाकडून हवी परवानगी! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

जळगाव - शहरातील विविध वसाहतींसह मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था असून, रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ते तयार करणे आवश्‍यक आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. 

जळगाव - शहरातील विविध वसाहतींसह मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था असून, रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ते तयार करणे आवश्‍यक आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. 

शहरातील वर्ष- दीड वर्षापासून दुरुस्ती न झाल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे असंख्य नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम होणार आहे. त्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी योजनेचे काम झाल्यानंतर रस्तेदुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे जलवाहिनीसाठी खोदले जाणाऱ्या रस्त्यांव्यतिरिक्त इतर रस्त्यांची दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

दोन टप्प्यांत रस्त्यांची दुरुस्ती 
शासनाने परवानगी दिल्यास दोन टप्प्यांत रस्त्यांची दुरुस्ती व रस्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्यात रस्त्यांतील खड्डे बुजविणे, तसेच ज्या ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे काम होणार नाही, तिथे रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. 

चार कोटींचा निधी शिल्लक 
शहरातील रस्तेदुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी महापालिकेकडे शिल्लक आहे. त्यातून रस्तेदुरुस्ती करावी, यासाठी शासनाकडे महापालिकेने परवानगी मागितली असून, लवकर परवानगी मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम केले जाईल. 

महापौर ललित कोल्हे 
शहरातील अनेक रस्त्यांची दैना झाली असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडे रस्तेदुरुस्तीसाठी निधी असून, अमृत योजनेमुळे ते करता येत नसल्याने ज्या ठिकाणी जलवाहिनी खोदण्याचे काम होणार नाही, तेथील रस्तेदुरुस्तीसाठी परवानगी शासनाकडे मागितली आहे. 
- ललित कोल्हे. महापौर 

Web Title: jalgaon news Permission from Government to Repair Roads