जळगावमध्ये पावसाची हजेरी; हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले

file photo
file photo

जळगावः जिल्ह्यातील हतनूर धरण परिसरात पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे हतनूर धरणातील पाण्याची पातळीत वाढ झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून २४.०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली होती, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. जळगावातील तापी आणी पूर्णाच्या उगमस्थानावर हतनूर  धरण परिसरात पाऊस पावसाने हजेरी लावल्यामुळे हतनूर धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

धरणात सध्या २०८.३९० मीटर पाण्याची पातळी असून १५०.७० दलघमी साठा आहे. हतनूर धरणाच्याच्या पाणलोट क्षेत्रातील बऱ्हाणपूर (१९.२ मिमी), देडतलाई (२२.००), टेक्सा (१९.२), एरडी १०.६), गोपाळखेडा (२.८), चिखलदरा (२१.८), लखपुरी (२.६) लोहारा येथे (६.२ मिमी) पाऊस झाला. तसेच भुसावळ मंडळात २४.४० मिमी, वरणगाव २१.००, पिंपळगाव १३ तर कुऱ्हा पानाचे मंडळात मिमी पावसाची नोंद झाली.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com