जळगाव जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नमाजपठण करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा

जळगाव: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदचा सण आज जळगाव शहरासह संपुर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. शहरातील ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदनिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

नमाजपठण करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा

जळगाव: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदचा सण आज जळगाव शहरासह संपुर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. शहरातील ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदनिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

रमजान ईद असल्याने आज (ता.26) शहरातील तांबापुरा, भिलपुरा, शनिपेठ, शाहूनगर या ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी होती. ईदनिमित्त बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विविध खाद्यपदार्थ, कपडे आदी खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होती. ईदचा शिरखुर्मा खाण्यासाठी ठिकठिकाणी नातेवाइकांना आमंत्रित करण्यात आले होते. नमाजपठणानंतर दुवाचा कार्यक्रम झाला. यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.

सुन्नी मुस्लिम
सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे अंजिठा रोडवरील सुप्रीम कॉलनीतील इदगाह मैदानावर ईद उल फित्र (रमजान ईद) साजरी झाली. या निमित्त सकाळी नऊला नमाजपठण करण्यात आले. मौलाना जाबीर रजा रजवी यांनी नमाज पढविली. नमाजबद्दल मौलाना नजमुक हक यांनी माहिती दिली. नमाजानंतर दुवा करण्यात आली व संलातो सलाम पाठविण्यात आले. इदगाहचे संस्थापक अध्यक्ष अयाज अली यांनी इदगाहबद्दल माहिती दिली.

Web Title: jalgaon news ramjan eid