‘पॉज’चे ‘क्‍लोज’ बटन दाबून रेशन माल काळ्या बाजारात!

देविदास वाणी
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

जळगाव - स्वस्त धान्य दुकानांत राज्यात सर्वत्र ‘पीओएस’ (पॉज) मशिनद्वारे धान्य वितरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक जुलैपासून सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना ‘पीओएस’ मशिनद्वारे आधार कार्डाशी जोडूनच संबंधित ग्राहकांना त्यांच्या वाट्याचे धान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, काही दुकानदार ‘पीओएस’ मशिनमधील ‘क्‍लोज’ बटन दाबतात. यामुळे त्याद्वारे धान्य वितरण करणे बंद होते. त्यानंतर हाताने बिले करून धान्य वितरित केले जाते. हा प्रकार जिल्हा पुरवठा विभागाच्या लक्षात येताच, त्यांनी संबंधित दुकानांची चौकशी सुरू केली आहे.

ग्राहकांच्या वाट्याचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा प्रकार नवीन नाही. स्वस्त धान्य दुकानांत केव्हा धान्य येते व संपते केव्हा? हेही शिधापत्रिकाधारकाला कळत नाही. स्वस्त धान्य दुकानांतील मालाची व्यापाऱ्यांकडे विक्री होते, असा आरोप आमदार किशोर पाटील यांनी नियोजन समितीच्या सभेत केला होता. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना रेशन मालाच्या गैरव्यवहार प्रकरणी लक्ष घालण्यासही सांगण्यात आले होते.

स्वस्त धान्य दुकानांतील मालाच्या होणाऱ्या गैरव्यवहार प्रकरणी शासनातर्फे शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडून धान्यवाटप व ‘पीओएस’ मशिनचा वापर करण्याचा निर्णय विचाराधीन होता. एक जुलैपासून जिल्ह्यातील एक हजार ९२८ स्वस्त धान्य दुकानदारांना ‘पीओएस’ मशिनचे वाटप करून त्याद्वारेच धान्य वितरित करण्याचे सांगण्यात आले होते.

दुकानदारांनी मशिन घेतल्या. मात्र, त्यात ‘सेल क्‍लोज’चे बटन आहे. ते दाबले गेल्यास पुन्हा सुरू करण्यासाठी बराच वेळ लागतो. शासनाला कळवून संबंधित अधिकारी येईपर्यंत मशिन बंदच राहते. मशिन बंद होताच स्वस्त धान्य दुकानदार हाताने विक्रीच्या पावत्या करून माल विकला गेल्याचे दाखवितो. हा प्रकार रेशनचा माल संबंधितांना न देताच त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे ज्या दुकानदारांनी ‘सेल क्‍लोज’चे बटन दाखवून ‘पीओएस’ मशिन बंद करून माल विक्रीच्या हाताने पावत्या केल्या, त्यांची चौकशी होणार आहे. पुढे जाऊन संबंधित दुकानमालकांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

तालुकावार तांत्रिक अधिकारी
‘पीओएस’ मशिन बंद पडले, तर ते तत्काळ दुरुस्त करण्यासाठी शासनानेच प्रत्येक तालुक्‍यात एक, असे पंधरा तालुक्‍यांत पंधरा तांत्रिक अधिकारी तहसील कार्यालयात नेमले आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिका आधार कार्ड इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी दरमहा तीन हजारांची तरतूद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ‘पीओएस’ मशिन एक हजार ९२८ दुकानदारांना वितरित झाल्या आहेत. त्याद्वारे धान्यवाटप सुरू आहे. जे दुकानदार ‘सेल क्‍लोज’चे बटन दाबून धान्य विक्रीच्या पावत्या हाताने करतील, अशांची चौकशी होऊन कारवाई केली जाईल.
- विलास हरिमकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी

Web Title: jalgaon news ration shop