पळून जाताना मलकापूरजवळ दरोडेखोरांच्या वाहनाला अपघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जळगाव - शहरात राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी जैन मंदिराजवळील आयडीबीआय बॅंकेच्या ‘एटीएम’वर मंगळवारी (९ जानेवारी) पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सुरक्षारक्षकाला शस्त्र लावून दरोडेखोरांनी चक्क एटीएम मशिन लांबविण्याचा प्रयत्न केला.

दरोडेखोरांच्या हालचाली ‘सीसीटीव्ही’त कैद झाल्या आहेत. त्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू असताना मिळालेल्या माहितीचा पाठलाग करताना नाशिक येथील पथक थेट मलकापूरपर्यंत पोचले आहे. गुन्हा करून पळून जात असताना संशयितांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांनी बेवारस वाहन सोडून पळ काढला असून, वाहन पोलिसांत जमा करण्यात आले आहे.  

राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी जैन मंदिराशेजारील दादू अपार्टमेंटच्या पहिल्याच गाळ्यात आयडीबीआय बॅंकेचे एटीएम मशिन मंगळवारी पहाटे चोरट्यांनी चक्क दोरखंडाच्या साह्याने लांबविण्याचा प्रयत्न केला. चौघे दरोडेखोर केबिनमध्ये शिरल्यानंतर त्यांनी यंत्राला दोरखंड बांधून तो उखडण्याचा प्रयत्न करताना सुरक्षारक्षक भावसिंग सपकाळे यांनी मशिनमध्ये रक्कम नसल्याचे सांगितल्याने दरोडेखोरांनी एटीएमचे मोडेम, सुरक्षारक्षकाचा मोबाईल असे साहित्य उचलून पोबारा केला होता. पळून जाताना दरोडेखोर नागपूरच्या दिशेने पसार झाले. एटीएम यंत्र उखडून काढण्यासाठी त्यांनी क्वालिस कारचा (एमएच ४६, सी ८१७६) वापर केला.

प्रयत्न फसल्यानंतर पळून जाताना त्यांच्या वाहनाला मलकापूर (जि. बुलडाणा) येथे अपघात झाला. दरोडेखोरांनी कार सोडून पोबारा केला. 
महामार्गावर बेवारस स्थितीत मिळून आलेली क्वालिस कार मलकापूर पोलिसांनी जप्त केली आहे. दरोडेखोरांच्या तपासात असलेले सहाय्यक निरीक्षक सचिन बागूल यांच्यासह गुन्हेशाखेचे एक पथक नाशिकला शोध घेत असताना त्यांना वाहनाची माहिती मिळाल्याने त्यांनी थेट मलकापूर गाठत वाहनाची सखोल तपासणी केली असून ते वाहन ताब्यात घेण्यात येणार आहे. पळून गेलेल्या दरोडेखोरांचा कसून शोध सुरू आहे.

Web Title: jalgaon news robber vehicle accident