‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता खानदेशात शिगेला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

जळगाव - कुंचल्यातून साकारल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळवून देणारी ‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा रविवारी (१७ डिसेंबर) होत असून, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खानदेशातील १२२ केंद्रांवर स्पर्धा होत असून, त्यात चार गटांत पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

जळगाव - कुंचल्यातून साकारल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळवून देणारी ‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा रविवारी (१७ डिसेंबर) होत असून, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खानदेशातील १२२ केंद्रांवर स्पर्धा होत असून, त्यात चार गटांत पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला वाव मिळावा, म्हणून ‘सकाळ’ने ही स्पर्धा सुरू केली असून, यंदा शाळांमधील नोंदणीसह महाराष्ट्र व गोव्यातील तसेच ऑनलाइन नोंदणीद्वारे अन्य राज्यांमधून व जगभरातील विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ‘सकाळ’च्या वाचकांच्या तीन पिढ्यांना जोडणारा आणि रंगरेषांचे आकर्षक विश्‍व विद्यार्थ्यांसाठी खुले करून देणारा उपक्रम म्हणून उमलत्या पिढीला सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. 

स्पर्धेचा निकाल जानेवारी २०१८ मध्ये ‘सकाळ’मधून प्रसिद्ध केला 

१२२ केंद्रांवर उद्या स्पर्धा
खानदेशात १२२ केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे. यात जळगाव जिल्ह्यात ६६, धुळे- ३५, तर नंदुरबार जिल्ह्यात २१ केंद्रांवर स्पर्धा होईल. स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ असे चार गट केले आहेत. गट ‘अ’- इयत्ता पहिली व दुसरी, गट ‘ब’- इयत्ता तिसरी व चौथी, गट ‘क’-इयत्ता पाचवी ते सातवी व गट ‘ड’-इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ‘क’ व ‘ड’ गटातील विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी ९ ते १०.३०; तर ‘अ’ व ‘ब’ गटातील परीक्षा सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत होईल. विद्यार्थ्यांना कागद ‘सकाळ’तर्फे विनामूल्य दिला जाईल. रंगसाहित्य विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर आणावयाचे आहे.

‘इंडिया आर्ट गॅलरी’चे संस्थापक मिलिंद साठेंचा स्पर्धकांसाठी कानमंत्र 
चित्र काढण्यासाठी तुम्ही काळी किंवा रंगीत पेन्सिली, क्रेयॉन्स (रंगीत खडू), पोस्टर कलर्स, ॲक्रालिक कलर्स, स्केच पेन्स इत्यादी माध्यमांचा स्वतंत्र किंवा एकत्रित वापर करू शकता. 
चित्र काढताना आकारांची मांडणी, लय, हावभाव, प्रमाणबद्धता याकडे लक्ष द्या. 
तुमचे चित्र ही तुमची स्वतःची अभिव्यक्ती असली पाहिजे व कुठल्याही चित्राची प्रतिकृती असू नये.
चित्र दिलेल्या वेळेत पूर्ण करा.
चित्र काढताना नवनवीन पद्धतींचा वापर करून चित्रकलेतला आनंद घ्या. आपल्या मनातील भाव कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करा. 
स्पर्धेत भाग घेऊन मजा करा, आनंद लुटा.

Web Title: jalgaon news sakal drawing competition