अखेर शासकीय धान्य खरेदी केंद्रे  पुन्हा सुरू करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

जळगाव - जिल्ह्यात गेल्या ३१ डिसेंबर २०१७ ला बंद झालेली शासकीय धान्य खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ही केंद्रे बंद झाल्याने शेतकऱ्यांची धान्य विक्रीबाबत सुरू झालेल्या ससेहोलपटबाबत ‘सकाळ’ने १ जानेवारी २०१८ ला ‘थर्ड आय’च्या माध्यमातून व्यथा मांडल्या होत्या. त्यावर जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमळ साळुंखे यांनी बंद खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत पणन महासंघ, शासनाला पत्र पाठविण्याचे आश्‍वासन दिले होते. बंद झालेले जामनेर येथील केंद्र आज सुरू झाल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी साळुंखे यांनी दिली. 

बोदवड, रावेर, अमळनेर, चोपडा, पारोळा येथील केंद्र सोमवारपासून (१५ जानेवारी) सुरू होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे अशांची खरेदी या केंद्रांवर आता केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली शासकीय केंद्रे ३१ डिसेंबर २०१७ ला बंद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल, केंद्र कशी केवळ फार्स ठरताहेत याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने ‘थर्ड आय’च्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते. ही केंद्रे सुरू झाल्याने ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी पुन्हा सुरू होणार असल्याने शेतकरी ‘सकाळ’ला धन्यवाद देत आहेत.

Web Title: jalgaon news sakal news impact

टॅग्स