जळगावात पुन्हा शॉपिंग उत्सवाची धमाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

जळगाव  - खरेदीची धमाल नेहमीप्रमाणेच जळगावकरांना करता यावी, या उद्देशातून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पुन्हा शॉपिंग उत्सव आयोजित करीत आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानावर १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान जनतेला ही महोत्सवाची पर्वणी अनुभवता येणार आहे. त्या अनुषंगाने शॉपिंग उत्सवातील स्टॉल बुकिंग सुरू झाली आहे. 

‘सकाळ’तर्फे आयोजित या उत्सवात गृहोपयोगी वस्तूंची शॉपिंग करण्यासोबतच ऑटो एक्‍स्पोलाही भेट देता येणार आहे. एकाच छताखाली गृहोपयोगी वस्तू आणि चारचाकी वाहनांचे ‘ऑटो एक्‍स्पो’ जळगावसह जिल्ह्यातील जनतेसासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असते. वर्षभरात दोन वेळा भरविल्या जाणाऱ्या उत्सवास ग्राहकांचा तितकाच उत्तम प्रतिसाद लाभतो.

या आगळ्यावेगळ्या उत्सवासोबतच खवय्यांना विविध खाद्यपदार्थांची चव चाखायला देणारा फूड फेस्टिव्हलचा आनंदही लुटता येणार आहे. शिवतीर्थ मैदानावर १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव भरविण्यात येत असून, त्याचे आदित्य कार्स प्रायोजक, तर किरण फर्निचर, भुसावळ व गोदरेज अप्लायन्सेस सहप्रायोजक आहेत. 

दुचाकी, चारचाकी वाहनांचे प्रदर्शन 
गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसोबतच ग्राहकांना दुचाकी व चारचाकी वाहनांची नवीन मालिकांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. आगळेवेगळे ‘ऑटो एक्‍स्पो’ प्रदर्शनही एक फेब्रुवारीलाच ग्राहकांसाठी खुले होणार आहे. यात विविध प्रकारची दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्राहकांना पाहण्यासह बुकिंग करता येतील. याशिवाय शॉपिंगसाठी येणाऱ्यांना फूड फेस्टिव्हलमध्ये विविध पदार्थांची चव चाखता येईल. या महोत्सवासाठी स्टॉल बुकिंग सुरू झाली असून, त्यासाठी मुनिरा तरवारी (९८८११३४२१८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: jalgaon news sakal shopping utsav