'सकाळ-तनिष्का', 'यिन'तर्फे स्वच्छता अभियान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

शहरासह ग्रामीण भागातही केला स्वच्छतेचा जागर

जळगाव: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून "सकाळ' माध्यम समूहातर्फे आज (सोमवार) शहरासह ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात सकाळी अकरा वाजेपासून शहरातील गोलाणी मार्केट, दादावाडी, कालिंकामाता व जिल्हापेठ परिसरात महिला व तरुणाईने स्वच्छता केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंधरा दिवसांपासून विविध भागांमध्ये सुरू स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात "यिन' व "तनिष्का' व्यासपीठातर्फे हे अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत संकल्पना साकारण्यासाठी "स्वच्छता ही सेवा' यावर आधारित स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. या उपक्रमात आज "तनिष्का' व "यिन'च्या सदस्यांनी शहरातील मुख्य परिसरात स्वच्छता केली. यावेळी सदस्यांसमवेत यीन समन्वयक अंकूश सोनवणे व छायाचित्रकार संधीपाल वानखेडे यांनी देखील स्वच्छता केली.

ग्रामीण भागातही अभियान
गांधी जयंतीनिमित्त शहरासह ग्रामीण भागात देखील स्वच्छता अभियान आले. यात पाचोरा, भडगाव, अमळनेर, भुसावळ, रावेर, वरणगाव याठिकाणी "तनिष्का' व "यिन' सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ केला.

Web Title: jalgaon news sakal tanishka yin by cleanliness campaign