अमळनेरच्या चार वाळू माफियांचे 'एमपीडीए' प्रस्ताव तयार 

योगेश महाजन
शनिवार, 8 जुलै 2017

बोरी, तापी व पांझरा नद्यांमध्ये वाळू चोरट्यांनी कहर केला आहे. राजकीय वरदहस्ताने या माफियींना चांगलेच फावले आहे. महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमक्‍या देणे, ट्रॅक्‍टर पळवून नेणे आदी प्रकार नित्याचेच होते. याचा मोठ्या प्रमाणात प्रशासनाला त्रास होत आहे.

अमळनेर - जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशाने चार वाळू माफियांचे एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्यात आहेत. हे प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी आज दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. 

तालुक्‍यातील बोरी, तापी व पांझरा नद्यांमध्ये वाळू चोरट्यांनी कहर केला आहे. राजकीय वरदहस्ताने या माफियींना चांगलेच फावले आहे. महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमक्‍या देणे, ट्रॅक्‍टर पळवून नेणे आदी प्रकार नित्याचेच होते. याचा मोठ्या प्रमाणात प्रशासनाला त्रास होत आहे. बेसुमार अवैध वाळू उपशाने नदीपात्राचा संपूर्ण ऱ्हास होत आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी याची गंभीर दखल घेऊन वाळू चोरांचे एमपीडीए प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. याअनुषंगाने तहसीलदार पाटील यांनी वाळू चोरीचे गुन्हे दाखल झालेले व दंड भरलेल्या चार वाळू चोरट्यांचे प्रस्ताव तयार केले असून, लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. 

दरम्यान, यापूर्वी अवैध वाळू चोरीप्रकरणी नगरसेवक घनश्‍याम पाटील याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए प्रस्तावावरून स्थानबद्धतेचे 15 फेब्रुवारी 2017 आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच तो फरारी झाला होता. याबाबत पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांचे एक पथक नेमण्यात आले होते. त्या पथकाने घनश्‍याम पाटीलचा विविध ठिकाणी शोध घेतला. या दरम्यान घनश्‍यामने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. आपणास कोणत्याही क्षणी अटक होणे अटळ आहे. या भितीने घनश्‍याम वकिलामार्फत पोलिसांना नुकताच शरण गेला आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

Web Title: Jalgaon news sand mafia in Amalner