वाळूचोरी करणारे तीन ट्रॅक्‍टर पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

जळगाव - जिल्ह्यात वाळू उत्खननास महसूल प्रशासनाने पूर्णत: बंदी घातली आहे. असे असतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरूच आहे. तालुका पोलिसांच्या पथकाने आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले. याप्रकरणी चालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

‘महसूल’च्या पथकावरील वाढते हल्ले आणि तलाठी-मंडलाधिकारी व तहसीलदारांनाही वाळूचोर जुमानत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत तालुका पोलिसांनी कारवाईचे अस्त्र उपसत आज चक्क पथक तयार करून आपल्या हद्दीतून वाळूचा बेकायदा उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक बी. डी. पाटील, विजय दुसाने, उमेश भांडारकर, रवींद्र बोरसे आदींच्या वेगवेगळ्या पथकांनी तालुका हद्दीतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रीत करीत वेगवेगळ्या ठिकाणी तीन ट्रॅक्‍टर ताब्यात घेत तलाठी मनोहर बाविस्कर यांना पाचारण करून चालक, मालकांवर गुन्हे दाखल केले. कानळदा रस्त्यावर फुफनगरी फाट्यावर सकाळी आठला ट्रॅक्‍टर (एमएच १९ सीजे १४९४) वरील चालक विनोद रोहिदास सोनवणे, ट्रॅक्‍टरमालक भीमराव मराठे यांचे वाहन चोरीच्या वाळूसह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जळगाव गिरणा पंपिंग रोडवरील वृद्धाश्रमाजवळून चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या (एमएच १९, बीजी ३७७४) या ट्रॅक्‍टरला थांबवून विचारणा करताना चालक पसार झाल्याने वाहन ताब्यात घेत चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिसरे ट्रॅक्‍टर विनानंबरचे असून त्याच्याही चालक-मालकाचा शोध घेण्यात येत असून त्याच्याविरुद्धही वाळूचोरीसह बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: jalgaon news sand transport tractor seized