देवराई निर्माण करणे काळाची गरज : सयाजी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

वाघळी (ता. चाळीसगाव) येथे सयाजी शिंदे यांच्या सहयाद्री प्रतिस्थान च्या वतीने शेकडो वर्षयापूर्वी लोप पावलेली देवराई ची पुनर्निर्मिती चा शुभारंभ आज करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. माझी गाडी बंगला हा येथेच  राहील मात्र मी लावलेले एक वडाचे झाड शेकडो वर्षे जनतेला ऑक्सिजन देणार आहे.

चाळीसगाव (जि. जळगाव) : ऑक्सिजनच्या बदल्यात सृष्टीला आपण काहीही न देता उलट बेसुमार झाडांची कत्तल होते आहे त्यामुळे झाडी वाचली पाहिजे. यासाठी देवराई ची पुनरनिर्मिती करण्याची आवशकता आहे. वाघळी गावात पन्नन्स एकरातचाळीस हजार झाडांचे संगोपन करून साकारणारी देवराई राज्यात  मॉडेल ठरेल अशी माहिती राज्यातील सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज येथे केले आहे.

वाघळी (ता. चाळीसगाव) येथे सयाजी शिंदे यांच्या सहयाद्री प्रतिस्थान च्या वतीने शेकडो वर्षयापूर्वी लोप पावलेली देवराई ची पुनर्निर्मिती चा शुभारंभ आज करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. माझी गाडी बंगला हा येथेच  राहील मात्र मी लावलेले एक वडाचे झाड शेकडो वर्षे जनतेला ऑक्सिजन देणार आहे. त्यामुळे देवाचे रान असणाऱ्या या देवराई उभारणीसाठी व तिच्या संवर्धनातुन हजारो झाडे जगवली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त  केली.

या जगात एकच राजा आहे तो शेतकरी असून अन्नधान्य पिकविणारा ह्या सर्व राजाने निर्माण केलेल्या अन्नधान्य व फळे पिकांना अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली   कारण शेतकरी हा वृक्षसंवर्धन करणारा पहिला गुराखी आहे  यावेळी आमदार उन्मेष  पाटील जिप सभापती पोपट भोळे,  मुख्य वनसंरक्षक  राजेंद्र कदम, आनंद आसोलकर राजेश ठोंबरें, विकास चौधरी यांची उपस्थिती होती याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

  

Web Title: Jalgaon news Sayaji Shinde talked about tree