'आरटीई'तील 'गोरखधंदा'; प्रवेशासाठी पैशांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

जळगाव: आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना 25 टक्के आरक्षणानुसार नर्सरी व पहिलीमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. येत्या शैक्षणिक वर्षासाठी एनआयसीकडून लॉटरी पद्धतीने लॉट काढण्यात आले असून, विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करण्यात आले आहेत. मात्र, काही शाळांनी "आरटीई'मध्येही उखळ पांढरे करून घेण्याचा गोरखधंदा सुरू केल्या आहे. येथील उज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलसंदर्भात अशीच अशीच तक्रार शिक्षण विभागाकडे आली आहे. प्रवेशासाठी शाळेकडून पैशांची मागणी होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शाळेला नोटीस
आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. प्रवेश न देता पालकांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहे. उज्वल स्प्राउटर इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही "आरटीई'अंतर्गत प्रवेश निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी चक्क 7 हजार 880 रुपये इतक्‍या शुल्काची मागणी पालकाकडून करण्यात येत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे आली. या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शाळेला नोटीस बजावून संबंधित बालकास मोफत प्रवेश देवून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

'आरटीई'चे वास्तव
- "आरटीई' प्रवेशाच्या पहिल्या सोडतीत 1 हजार 526 प्रवेश निश्‍चित.
- शाळांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे "आरटीई'चे अनुदान ठप्प.
- प्रवेश देण्यासाठी शाळांची टाळाटाळ, पालकांची प्रवेशासाठी फिराफीर.
- पालकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तालुका स्तरावर नोडल अधिकारी.
- तरीही प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाईस टाळाटाळ.
- जिल्ह्यातील 261 शाळांना आरटीई प्रवेशाचे गेल्यावर्षीचे अनुदान प्राप्त.
- सुमारे दोन कोटी 11 लाखांचे अनुदान कोषागारकडे जमा.

Web Title: jalgaon news school admission rte money education