स्कूल बसला भरधाव ट्रकची धडक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

शीर्षक 
स्कूल बसला भरधाव ट्रकची धडक 

जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शीर्षक 
स्कूल बसला भरधाव ट्रकची धडक 

जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल बसवर (एमएच 19, वाय 6005) ललित मोहन धिंगे (रा. रामेश्वर कॉलनी) हे चालक म्हणून कामाला आहेत. सुमारास कालिंकामाता चौफुलीजवळून आज सकाळी साडेसातच्या चालकाने काही विद्यार्थ्यांना पिकअप केले. त्यानंतर ही बस खेडी रस्त्यावरील गोदावरी विद्यालयाकडे जाण्यास निघाली. बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना खेडीगावाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर भुसावळकडून जळगावकडे भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच 46, एफ 0121) स्कूल बसला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील तीन विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बसचालक ललित धिंगे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक गणेश पाटील (रा. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव 
या अपघातात बसमधील आरुष तुषार कोळी, गौरजा विश्‍वनाथ खडके व विराट सुयोग चोपडे हे तिघे विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती कळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

वाहतुकीचा खोळंबा 
अपघातात बसच्या एका बाजूच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 20 मिनिटे विस्कळित झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. यावेळी दोन्ही बाजूने वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागून खोळंबा झाला होता. 

विद्यार्थी थोडक्‍यात बचावले 
भरधाव येणाऱ्या ट्रकने दिलेली धडक इतकी जोरात होती, की बस पुलावरून थेट शेजारून वाहणाऱ्या नाल्यात कोसळत होती; परंतु चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्यामुळे बस जागेवरच थांबली. त्यामुळे बसमधील विद्यार्थी थोडक्‍यात बचावले; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news school bus acidant