पुण्यासाठी पहिली शिवशाही बस रवाना! 

राजेश सोनवणे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

जळगाव - लालपरी म्हणून ओळख असलेल्या परिवहन महामंडळाची बस आता कात टाकू लागली आहे. प्रवाशांना माफक दरातील वातानुकूलित शिवशाही बस उपलब्ध झाली असून, जळगाव- पुणे या लांबपल्ल्याच्या मार्गावर सोमवारी (ता. 8) रात्री साडेसातला पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. त्याच वेळी दुसरी बस पुणे ते जळगाव ही गाडी सुटली. 

जळगाव - लालपरी म्हणून ओळख असलेल्या परिवहन महामंडळाची बस आता कात टाकू लागली आहे. प्रवाशांना माफक दरातील वातानुकूलित शिवशाही बस उपलब्ध झाली असून, जळगाव- पुणे या लांबपल्ल्याच्या मार्गावर सोमवारी (ता. 8) रात्री साडेसातला पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. त्याच वेळी दुसरी बस पुणे ते जळगाव ही गाडी सुटली. 

जळगाव विभागाला शिवशाहीच्या दोन बस मिळाल्या असून, जळगाव- पुणे मार्गावर या बस धावणार आहेत. या बस सेवेचा शुभारंभ सोमवारी (ता.8) रात्री सातला बससाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, विभागीय वाहतुक अधिकारी व्ही. डी. धायडे, आगार व्यवस्थापक पी. एस. बोरसे, स्थानक प्रमुख निलिमा बागूल, पी. बी. चौधरी, वाहतूक निरीक्षक आर. एस. पाटील, राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते. यानंतर गुलाबाचे फूल देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. 

जळगावची प्रतिक्षा संपली 
खासगी ट्रॅव्हल्सला तोंड देण्यासाठी महामंडळाने सुरू केलेली शिवनेरी व्हॉल्व्हो या बसचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर "शिवशाही' ही एसी बसची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. व्हॉल्व्होपेक्षा कमी दरात वातानुकूलित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसची सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक मार्गावर बस सुरू झाली असून, जळगावसाठी ही अजून प्रतिक्षाच होती. ही प्रतिक्षा संपली असून, जळगाव- पुणे मार्गावरून पहिली शिवशाही बस धावली. 

25 प्रवाशी घेवून धावली बस 
जळगाव बसस्थानकातून पुण्यासाठी सायंकाळी बस रवाना झाली. पुणे मार्गावर धावणारी ही बस पहूर, सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणी थांबा घेवून पुणे जाईल. पहिली शिवशाही 25 प्रवाशी घेवून मार्गक्रमण झाली. या प्रवाशांमधील दहा जणांनी सिट आरक्षित केलेले होते. तर अन्य प्रवाशी ही स्थानकातून बसमध्ये बसले होते. बसमध्ये वाहक म्हणून महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी होते. तर चालक हे खासगी कंपनीद्वारे देण्यात आलेले होते. 

अनेकांनी घेतले सेल्फि 
खासगी ट्रॅव्हल्स्‌च्या स्पर्धेत  महामंडळाची शिवशाही सर्वांसाठी आकर्षण ठरली. बसस्थानकात उभी असलेली ही नवीन बस पाहण्यासाठी अनेक प्रवाशांनी गर्दी केली होती. शिवाय, बसच्या समोर उभे राहून सेल्फी घेणे अनेकांनी पसंत केले. इतकेच नाही, तर बसमधील प्रवाशांनी देखील अन्य प्रवाशांसोबत सेल्फी घेतली.

Web Title: jalgaon news shivshahi bus start jalgaon to pune