शेतकऱयांनो हिम्मत हारू नकाः जवान चंदू चव्हाण

शेतकऱयांनो हिम्मत हारू नकाः जवान चंदू चव्हाण
शेतकऱयांनो हिम्मत हारू नकाः जवान चंदू चव्हाण

नांदगाव: शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. कारण देवाने जीवन हे मरण्यासाठी नाही तर लढण्यासाठी दिले आहे. मी मरणाच्या दाढेतून परत आलो. माझा पुनर्जन्मच झाला. यापुढे देशाच्या रक्षणाबरोबरच समाजातल्या पीडीतांसाठी सुध्दा काम करणार आहे. शेतकऱयांनो हिम्मत हारू नका, असे उद्दगार पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत आलेले जवान चंदू चव्हाण यांनी काढले.

जळगाव खु. येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकमात ते बोलत होते. मधुकर पवार हे धुळे जिल्ह्यात काम करतात. त्यांच्या ओळखीतून चव्हाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सुरवातीस चंदू चव्हाण यांचे गावात भव्य स्वागत करण्यात आले. मारुती मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमास ग्रामस्थांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. माजी सैनिक ऍड. गुलाबराव पालवे अध्यक्षस्थानी होते. हरिदास टिळेकर, सुरेश गायकवाड व मान्यवर व्यासपीठावर होते. निंबा रामचंद्र सरोदे यांनी सुत्रसंचालन केले.

पाकिस्तानच्या कारागृहामध्ये यमयातना भोगाव्या लागल्या. दररोज मारहाण करत असत. कानातून रक्त यायचे. सगळ्या गोष्टी येथे सांगू शकत नाही. परंतु, डॉ. सुभाष भामरे, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज यांनी खूप मदत केली. परमेश्वर जगात आहे. तो आईवडील, भाऊ बहिण यांच्या रुपात भेटतो. प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, नंतर गावाचा विचार केला पाहिजे. चव्हाण यांच्या भावनिक कथनाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. शिवाजी सरोदे, अनिल सरोदे, दत्तू सरोदे, साहेबराव सरोदे, संतोष डोखे, राजाराम सरोदे, संजय काकळीज, नाना डोखे, पुंजाराम सरोदे, रमेश सरोदे, सुकदेव आवटे उपस्थित होते.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com