खानदेशात दहावीमध्येही मुलीच अव्वल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

यंदाही मुलीच अव्वल 
नाशिक विभागातून दहावीला बसलेल्या 1 लाख 14 हजार 352 मुलांमधून 97 हजार 771 उत्तीर्ण झाली आहेत. त्यांचा निकाल 85.50 टक्के आहे. तर 88 हजार 126 मुलींपैकी 79 हजार 922 उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्‍केवारी 90.69 इतकी आहे. जळगाव जिल्ह्यातील निकालात 90.71 टक्के मुले उत्तीर्ण झाल्या आहेत. 23 हजार 157 मुलींनी प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे. 

जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. नाशिक विभागातून जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांतून सुमारे 2 लाख 2 हजार 478 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 1 लाख 77 हजार 693 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नाशिक विभागाचा एकूण निकाल 87.76 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षाची परंपरा कायम ठेवीत, यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, एकूण निकालात 90.69 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

जळगाव जिल्ह्यातून यंदा एकूण 61 हजार 825 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जळगाव जिल्ह्याचा निकाल 87.78 टक्के लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून 20 हजार 742 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट असलेल्यांपैकी 17 हजार 917 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 86.78 टक्के निकाल लागला आहे. तर धुळे जिल्ह्यातून 28 हजार 732 पैकी 25 हजार 799 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने, जिल्ह्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. नाशिक विभागातून धुळे जिल्ह्याने बाजी मारली आहे. 

यंदाही मुलीच अव्वल 
नाशिक विभागातून दहावीला बसलेल्या 1 लाख 14 हजार 352 मुलांमधून 97 हजार 771 उत्तीर्ण झाली आहेत. त्यांचा निकाल 85.50 टक्के आहे. तर 88 हजार 126 मुलींपैकी 79 हजार 922 उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्‍केवारी 90.69 इतकी आहे. जळगाव जिल्ह्यातील निकालात 90.71 टक्के मुले उत्तीर्ण झाल्या आहेत. 23 हजार 157 मुलींनी प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे. 

नाशिक विभागाचा बारावी निकाल 
जिल्हा, प्रविष्ट विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी, निकालाची टक्केवारी 
नाशिक - 91 हजार 179, 79 हजार 710, 87.42 
धुळे - 28 हजार 732, 25 हजार 799, 89.79 
जळगाव - 61 हजार 825, 54 हजार 267, 87.78 
नंदुरबार - 20 हजार 742, 17 हजार 917, 86.38 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
चँपियन्स करंडक: भारत-पाकिस्तान पुन्हा लढणार?
दहावीचा निकाल 88.74%; मुलींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल
गुजरातमध्ये स्मृती इराणींच्या दिशेने फेकल्या बांगड्या
शेतीविकासासाठी गरज ‘मर्दा’ची
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​

Web Title: Jalgaon news SSC board results declared