अमळनेरला एसटी कर्मचाऱ्याने केले मुंडन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

डी. सी. संदानशिव यांनी आज सकाळी मुंडन करून शासनाचा निषेध केला आहे. यावेळी इंटक युनियनचे अध्यक्ष विजय पाटील, सचिव संतोष चौधरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरे, सचिव बी. एस. वानखेडे, एल. टी. पाटील, प्रवीण मिस्तरी, एस. टी. पवार, शशिकांत पाटील, डी. ए. मराठे, नितीन पाटील, एन. वाय. सोनवणे, अविनाश धनगर, भगवान पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील बस आगारातील सुमारे 450 कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत.

डी. सी. संदानशिव यांनी आज सकाळी मुंडन करून शासनाचा निषेध केला आहे. यावेळी इंटक युनियनचे अध्यक्ष विजय पाटील, सचिव संतोष चौधरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरे, सचिव बी. एस. वानखेडे, एल. टी. पाटील, प्रवीण मिस्तरी, एस. टी. पवार, शशिकांत पाटील, डी. ए. मराठे, नितीन पाटील, एन. वाय. सोनवणे, अविनाश धनगर, भगवान पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 160 वाहक, 188 चालक व यांत्रिक कर्मचारी 49 व इतर 45 अशांनी संपात सहभाग नोंदविला आहे.

शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर आमचा संप सुरूच राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया संदानशिव यांनी दिली. बस आगारात मंडप टाकण्यात आला असून, सर्वत्र शुकशुकाट आहे. पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा व्यवसाय मात्र सध्या तेजीत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Jalgaon news ST employee strike in Amalner