स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

जळगाव - महापालिका स्थायी समिती सभापती निवड लवकरच होणार असून, समितीतील आठ सदस्यदेखील नवीन निवडले जाणार आहेत. स्थायी समितीची शुक्रवारी (१५ सप्टेंबर) सभा होणार आहे. यात कार्यकाळ पूर्ण झालेले सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. या सदस्यांमध्ये नगरसेविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्राकंडून मिळाली.

महापौर निवड झाली असून, उद्या (१३ सप्टेंबर) उपमहापौरांची निवड होणार आहे. स्थायी समिती सभापतींची महिनाभरात निवड होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकराला सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. आठ सदस्यांची मुदत एक ऑक्‍टोबरला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ‘खाविआ’चे श्‍यामकांत सोनवणे, दत्तात्रय कोळी, ज्योती इंगळे, ममता कोल्हे, भाजपचे पृथ्वीराज सोनवणे, विजयकुमार गेही, मनसेचे अनंत जोशी आणि ‘राष्ट्रवादी’च्या गायत्री शिंदे असणार आहे. त्यामुळे ज्या पक्षातील सदस्यांना संधी मिळाली नाही, अशांचा स्थायी समितीत समावेश करण्यात येणार असल्याच्या  हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली. 

सदस्यांसाठी या नावांची चर्चा
स्थायी समितीत नवीन आठ सदस्यांची निवड होणार आहे. महिला नगरसेविकांना स्थायी समितीत सदस्य म्हणून संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यात ‘खाविआ’तर्फे ज्योती इंगळे, संगीता दांडेकर, ज्योती तायडे, हेमलता नाईक, ‘मनसे’तर्फे पार्वताबाई भिल, भाजपतर्फे ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, उज्ज्वला बाविस्कर आणि ‘राष्ट्रवादी’तर्फे प्रतिभा कापसे यांच्या नावाची चर्चा आहे.

उपमहापौरपदाची आज घोषणा
ललित कोल्हे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार ‘खाविआ’चे गणेश सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, उद्या (१३ सप्टेंबर) महापौर निवडीची सभा उद्या सकाळी अकराला पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. एकमेव अर्ज दाखल असल्याने सोनवणे यांची नावाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

Web Title: jalgaon news standing committee 8 member retired