तरुणाची बसखाली झोकून देत आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

बसचालकाने पादाचाऱ्याला चिरडल्याचे दोन्ही बाजूची वाहतूक जागच्या जागीच थांबून जात, वाहन धारकांनी अपघाताच्या दिशेने धाव घेतली. काहींनी बस चालकाला लाखोली वाहिली, मात्र शिरसोलीच्या तरुणाने त्यांना घडला प्रकार सांगीतल्याने तणाव मिटला. वाहतूक पोलिस,जिल्हापेठ पोलिसांनी अपघातग्रस्त बस पोलिस ठाण्यात नेल्याने प्रवाश्‍यांना बसस्थानकातून तत्काळ दुसऱ्या बसची सोय करण्यात आली

जळगाव - शहरातील स्वातंत्र्य चौकात दुपारी 12.40 वाजता धावत्या बस खाली स्वत:ला झोकून देत पस्तीसवर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्त्या केल्याची घटना घडली. शहराच्या मुख्य चौकात आणि ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. चौकातील वाहतूक ठप्प होवून जिल्हापेठ पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शी तरुणांनी घडला प्रकार पोलिसांसह घटनास्थळावर सांगीतल्याने पुढील अनर्थ टळला असून जिल्हापेठ पोलिसांत या प्रकरणी असक्‍मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

नवीन बसस्थानकातून ठिक 12.40 वाजता जळगाव-औरंगाबाद बस क्र.(एमएच.20.बी.एल.2162) घेवून चालक....महिला वाहक श्री.आर.आर वढोदे औरंगाबादच्या दिशेने प्रवासी घेवून जात होते. बसस्थानकातून बस सुटल्यानंतर काही वेळातच स्वातंत्र्य चौकात बसच्या मागील चाकात आल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूची वाहतूक जागीच थांबून इतर वाहन धारकांनी बसखाली चिरडला गेलेल्या तरुणाला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो जागीच गतप्राण होवून रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. घडला प्रकार वाहतूक पोलिसाने नियंत्रणकक्षाला कळवल्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक गिरधर निकम आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रुग्णवाहीका बोलवत मृतदेह तत्काळ जिल्हारुग्णालयात हलवण्यात आला. मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय कुरकूरे यांनी तपासणी अंती अपघाती तरुणाला मृत घोषीत केले. 

असा झाला अपघात... 
प्रत्यक्षदर्शी आणि अपघाती बसच्या मागे असलेले दुचाकीस्वार भिमा बारी(शिरसोली) यांनी, पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार..सिग्नल बंद असतांना पासून हा..तरुण स्वातंत्र्य चौकात दुभाजकाला लागूनच उभा होता, सिग्नल सूटल्यावर वाहने धावू लागल्यावर त्याने अचानक खाली वाकतच...बसच्या दिशेने झेप घेतली. बसच्या मागच्या चाकाखाली त्याचे डोके व चेहरा आल्याने तो जागीच मृत्यू मुखी पडला. 

गोंधळ अन्‌ वाहतुक ठप्प.. 
बसचालकाने पादाचाऱ्याला चिरडल्याचे दोन्ही बाजूची वाहतूक जागच्या जागीच थांबून जात, वाहन धारकांनी अपघाताच्या दिशेने धाव घेतली. काहींनी बस चालकाला लाखोली वाहिली, मात्र शिरसोलीच्या तरुणाने त्यांना घडला प्रकार सांगीतल्याने तणाव मिटला. वाहतूक पोलिस,जिल्हापेठ पोलिसांनी अपघातग्रस्त बस पोलिस ठाण्यात नेल्याने प्रवाश्‍यांना बसस्थानकातून तत्काळ दुसऱ्या बसची सोय करण्यात आली. 

मयताची ओळख पटेना 
मयत तरुण, साधारण तीस-पस्तीस वर्षे वयाचा असून त्याच्या खिश्‍यात पोलिसांना कुठलेही कागदपत्रे ओळख म्हणून मिळून आलेले नाही. तर, खिश्‍यात गांजा च्या दोन पुड्या त्याच्या खिश्‍यात सापडल्याने तो, व्यसनाधीन तरुण असण्याची शक्‍यता पिोलसांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: jalgaon news: suicide