गाव हागणदारीमुक्‍तीसाठी २० जुलैचा अल्टिमेटम!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

जळगाव - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. जिल्ह्यातील ६० पेक्षा कमी शौचालये बांधण्याचे काम बाकी असलेल्या गावांना २० जुलैपर्यंत हागणदारीमुक्‍त करण्याचे आदेश  ग्रामसेवकांना देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने आज पूज्य साने गुरुजी सभागृहात ग्रामसेवक व गटसमन्वयक यांची आढावा बैठक घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी आढावा घेतला. शौचालय बांधकामासाठी यंदा ७६७ ग्रामपंचायती हागणदारी मुक्तीचे उद्दीष्ट घेण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत ३८४ गावे हागणदारी मुक्‍त झाले आहेत. तर ऑगस्टपर्यंत आणखी दोनशे गावे हागणदारी मुक्‍त करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. यामधील ज्या गावांमध्ये ६० पेक्षा कमी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम बाकी आहे; अशा ४७ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना २० जुलैपर्यंत हे काम शंभर टक्‍के पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

उद्या पुन्हा आढावा
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत वैयक्‍तिक शौचालयांचे काम पूर्ण करावयाचे असून, त्या अनुषंगाने आढावा घेण्याचे काम सुरू आहे. यात गुरुवारी (ता. १३) ज्या गावांमध्ये १०० ते १५० शौचालयांचे काम बाकी अशा गावचे ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

Web Title: jalgaon news swachh bharat abhiyan