ग्रामपंचायत सदस्‍याने केली पोलिस पाटलांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

चाळीसगाव (जळगाव): गावात होणार्‍या भांडणांची माहिती पोलिसांना का देतो, असे म्‍हणून तालुक्‍यातील टाकळी प्र.चा येथील ग्रामपंचायत सदस्‍याने पोलिस पाटलांना मारहाण केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्‍यातील टाकळी प्र.चा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज (सोमवार) सकाळी राष्‍ट्रीय ग्रामस्‍वराज्‍य अभियानाअंतर्गंत विकास आराखडा व्‍यवस्‍थापन समितीची कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. कार्यशाळा सुरू होण्‍यापूर्वी टाकळी प्र.चा चे पोलिस पाटील हे किरण रंगराव पाटील हे कार्यालयात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्‍य शाम उर्प आण्‍णा नारायण गवळी यांनी पोलिस पाटील किरण पाटील यांना गावात झालेली भांडणे तू पोलिसांना का कळवितो, असे म्‍हणत मारहाण केली.

किरण पाटील यांना छातीवर पाठीवर मारहाण करण्‍यात आली असून, याबाबत पोलिसांना माहिती दिली तर तुला जीवे ठार मारेल अशी धमकीही ग्रामपंचायत सदस्‍य आण्‍णा गवळी यांनी पोलिस पाटलांना दिली. याप्रकरणी किरण पाटील यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून शाम गवळी यांच्‍याविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

Web Title: jalgaon news takali gram panchayat police patil crime