चहा विक्रेता करतोय स्वखर्चातून ग्रामस्वच्छता! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

जळगाव - गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अनेक गावांमध्ये अस्वच्छतेचा प्रश्‍न कायम असून, ही समस्या दूर सारण्यात प्रशासन देखील कमी पडत आहे. पण कोणी स्वतःहून पुढाकार घेत गाव स्वच्छ करणाऱ्यांचे प्रमाण शुन्यच. मात्र जामनेर तालुक्‍यातील लिहेतांडा येथील चहा विक्रेता असलेले भावलाल राठोड हे स्वखर्चातून स्वच्छतेचे काम करून गाव सुंदर बनविण्याचा एक प्रयत्न करत आहेत. 

जळगाव - गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अनेक गावांमध्ये अस्वच्छतेचा प्रश्‍न कायम असून, ही समस्या दूर सारण्यात प्रशासन देखील कमी पडत आहे. पण कोणी स्वतःहून पुढाकार घेत गाव स्वच्छ करणाऱ्यांचे प्रमाण शुन्यच. मात्र जामनेर तालुक्‍यातील लिहेतांडा येथील चहा विक्रेता असलेले भावलाल राठोड हे स्वखर्चातून स्वच्छतेचे काम करून गाव सुंदर बनविण्याचा एक प्रयत्न करत आहेत. 

शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू आहे. ग्रामस्वच्छतेसाठी शासन करोडो रुपये खर्च करत आहे. केंद्र व राज्यस्तरावरुन ग्रामपातळीपर्यत निधी पुरविला जात आहे. मात्र, जिल्ह्यात अजूनही अस्वच्छतेचा प्रश्‍न कायम आहे. इतकेच नाही तर गाव हागणदारी मुक्‍त करण्यासाठी लाभार्थ्यांना 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तरी देखील गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. यातीलच लिहेतांडा (ता. जामनेर) या गावाचा समावेश होत आहे. 

राठोडच देतात रोजंदारीचे पैसे 
जामनेर तालुक्‍यातील लिहे तांडा येथे अस्वच्छता पसरली असून ग्रामपंचायतीचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने गावात असलेला कचरा, नाला, गटारी सफाईचे कामे होणे आवश्‍यक आहे. परंतु ग्रामपंचायमार्फत नालेसफाई तसेच स्वच्छता विषयक कामे करण्यात आलेली नाही. स्वच्छतेचा प्रश्‍न बिकट होत असल्याने गावातील चहा विक्रेते असलेले भावलाल राठोड यांनी स्वखर्चातून ग्रामस्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गावातील नालेसफाई तसेच स्वच्छतेची सर्व कामे स्वतः करत नसली तरी शेंदुर्णी येथील दोन माणसे रोजंदारीने लावून स्वच्छतेची कामे करीत आहे. त्यांची रोजंदारी भावलाल राठोड हे आपल्या खिशातून देत आहे. 

केवळ 40 टक्केच हागणदारीमुक्त 
लिहे तांडा गावाची लोकसंख्या सात हजाराच्या जवळपास आहे. तर ग्रामपंचायत सदस्य संख्या ही अकरा आहे. असे असताना देखील गावात वैयक्‍तिक शौचालयांचा प्रश्‍न रेंगाळलेला आहे. शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विशेष प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. हागणदारीमुक्तीकडे गावाची वाटचाल अगदी संथगतीने सुरू असून केवळ 40 टक्केच काम झाले आहे. गावातील लोकसंख्या मोठी पण वैयक्तिक शौचालयाची संख्या कमी अशी परिस्थिती आहे. तीन वर्षापूर्वी गावासाठी केवळ एकच सामूहिक शौचालय बांधण्यात आले होते. मात्र यात अद्यापपर्यंत शौचासाठीचे पात्रच बसविण्यात आलेले नसून पाण्याची देखील व्यवस्था नाही. यामुळे हे शौचालय केवळ शोपीस म्हणून आहे. 

Web Title: jalgaon news Tea seller is self-cleaning village