शिक्षकाची बदली रद्दसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

जळगाव : शारदा माध्य विद्यालय (कळमसरे) येथील शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असून, विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या आहेत.

जळगाव : शारदा माध्य विद्यालय (कळमसरे) येथील शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असून, विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या आहेत.

विद्यार्थ्यांसह पालकांनी या आंदोलनात भाग घेतला असून, सस्थाचालकांची हुकुमशाही चालणार नाही असे म्हणत आंदोलन चिघळले आहे. पावरा यांची बदली ही संस्थेअंतर्गत झाली असून, ती बदली रद्द करण्याचा अधिकार पूर्ण संस्थेला आहे. त्यामुळे संस्था चालक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांनी प्रार्थनेवरही बहिष्कार टाकला आहे. मारवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

विद्यार्थीनी चक्कर येऊन पडल्या
विद्यार्थ्यांचे आंदोलन तिव्र झाले असून, विद्यार्थिनी चक्कर येवून पडल्या आहेत. उपचारासाठी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात मनीषा रणजितसिंग पाटील, रुचिता प्रकाश कुंभार, धनश्री विजय चौधरी, गायत्री हेमंत पाटील (सर्व वय 13), हर्षदा रणछोड पाटील (12), नेहा मोहन चौधरी (13) विद्या युवराज पाटील (10) या विद्यार्थिनी आहेत.

Web Title: jalgaon news teacher transfer and student strike